Sunday, May 31, 2026

Sobhita Dhulipala : नागा चैतन्यासोबतच्या नात्यावर होणाऱ्या ट्रॉलिंगवर पहिल्यांदाच बोलली सोभिता धूलिपाला ; म्हणाली..

Sobhita Dhulipala : नागा चैतन्यासोबतच्या नात्यावर होणाऱ्या ट्रॉलिंगवर पहिल्यांदाच बोलली सोभिता धूलिपाला ; म्हणाली..

सोभिता धूलिपाला व नागा चैतन्या यांचे नाते नेहमी चर्चेत राहिले आहे. समांथा रुथ प्रभूपासून विभक्त झाल्यानंतर नागा चैतन्याने सोभितासह ४ डिसेंबर २०२४ रोजी विवाह केला. लग्नाच्या आधीपासून या दोघांच्या नात्यावरून चर्चा रंगल्या होत्या. अनेकदा त्यांचे एकत्रित फोटो व्हायरल झाले होते, मात्र दोघांनीही आपल्या नात्याबद्दल गुप्तता पाळली होती.

">चाहत्यांमध्ये नागा चैतन्य आणि सोभिताच्या नात्याबद्दल कुतूहल आणि चर्चा राहिल्या आहेत. यावर पहिल्यांदाच सोभिता धुलिपाला हिने तिचे मत मांडले आहे.

मी माझं आयुष्य जगत होते - सोभिता

अभिनेत्री सोभिता धुलिपाला हिने एका दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केले. तसेच नेटकरी आणि चाहत्यांकडून सातत्याने तिच्या आणि नागा चैतन्याच्या नात्यावर लक्ष ठेवले जाते किवा बोलले जाते, यावरदेखील तिने मत मांडले आहे. शोभिताला लोकांच्या सततच्या चर्चेबाबत विचारण्यात आले. यावर ती म्हणाली, या सगळ्या अनुभवांनी मला खूप काही शिकवल आहे. या सगळ्यामुळे नक्कीच लोकांचे लक्ष वेधले गेले; पण सर्वांना उत्सुकता असते. त्याक्षणी मी फक्त माझे आयुष्य जगत होते त्यावेळी मी काय वागायला हवी होती लोकाना याची मला कल्पना नव्हती पण, मी माझे आयुष्य उत्तम जगत असून वेळेनुसार मला त्याची अधिक खात्री वाटते. काहीजण टोकाची टीका करत असले तरी त्याचा मी माझ्यावर कोणताही परिणाम करून घेत नाही, असे सोभिता धुलिपाला म्हणाली आहे.

अशा गोष्टी वेळेनुसार बदलतात

पुढे ती म्हणाली की, "एकंदरीतच सध्या प्रत्येक गोष्टीबद्दल इतकी चर्चा आणि इतका गदारोळ सुरू असतो की विचारू नका. हे अगदी वातावरणासारखे असते, असे वेळेनुसार वातावरण बदलते तसे ते बदलत राहते. हे त्याप्रमाणेच असते, त्यामुळे मी जास्त गांभीर्याने याचा विचार करत नाही. कारण अशा गोष्टी कायमस्वरूपी राहत नसतात. मला वाटते, अशा गोष्टी वेळेनुसार बदलतात आणि हे समजून घेण्यासाठी आपले मन स्थिर असणे गरजेचे असते, असे मत अभिनेत्री सोभिताने व्यक्त केले आहे.

कामाबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री सोभिता 'चीकाटिलो' या तेलगू क्राईम थ्रिलर सीरिजमध्ये झळकली होती. यानंतर ती प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक पी. रणजीत दिग्दर्शित, बहुप्रतीक्षित तमिळ मुव्ही 'वेटुवम'मध्ये दिसणार आहे. तसेच अभिनेता नागा चैतन्य लवकरच 'वृषकर्मा' चित्रपटामध्ये झळकणार आहे. कार्तिक दांडू दिग्दर्शित या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. हे जोडपे त्यांच्या कामासह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >