टॉयलेटमध्ये सापडली संशयास्पद चिठ्ठी :
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ७ वाजता गुवाहाटीकडे रवाना होणाऱ्या विमानात उड्डाणापूर्वी नियमित सुरक्षा तपासणी सुरू होती. सकाळी साडेसहा ते पावणेसातच्या दरम्यान एअर होस्टेसने विमानातील स्वच्छतागृहाची पाहणी केली असता तिला एक चिठ्ठी आढळली. त्या चिठ्ठीवर ठळक अक्षरात ‘बॉम्ब’ असा शब्द लिहिलेला होता. ही बाब लक्षात येताच एअर होस्टेसने तत्काळ पायलट आणि विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्यांना माहिती दिली. कोणताही धोका पत्करायचा नाही, या भूमिकेतून सुरक्षा यंत्रणांनी तातडीने कारवाई सुरू केली. (Pune International Airport)
Bhimashankar Temple Reopening Date : भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून दर्शनासाठी खुले; ऑनलाईन पास अनिवार्य, जाणून घ्या नवे नियम
पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या ...
विमान निर्जन भागात हलवले, सर्व प्रवाशांना खाली उतरवले :
सुरक्षा नियमांनुसार संबंधित विमानाला धावपट्टीवरील सुरक्षित आणि निर्जन भागात नेण्यात आले. त्यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे अनेक प्रवासी घाबरले होते, तर काहींनी आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक, सीआयएसएफ, विमानतळ सुरक्षा कर्मचारी आणि स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे तपास मोहीम हाती घेतली. (Pune International Airport)एक तास कसून तपासणी; मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही :
संपूर्ण विमान, सामान ठेवण्याची जागा, प्रवाशांचे बॅगेज आणि विमानातील प्रत्येक भागाची सखोल तपासणी करण्यात आली. जवळपास एक तास चाललेल्या या तपासादरम्यान कोणताही बॉम्ब, स्फोटक पदार्थ किंवा संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यानंतर ही केवळ खोटी धमकी असल्याचे स्पष्ट झाले. सुरक्षा यंत्रणांनी विमान पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री केल्यानंतर प्रवाशांना पुन्हा विमानात प्रवेश देण्यात आला आणि विमान गुवाहाटीकडे रवाना करण्यात आले. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमुळे उड्डाणाला काही काळ विलंब झाला. (Pune International Airport)
TCS Nashik Case : निदा खानला दिलासा नाही; जामीन अर्जावर १२ जूनला सुनावणी
नाशिक : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या नाशिक युनिटमधील कथित लैंगिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणातील प्रमुख आरोपी निदा खान हिच्या जामीन ...
खोडसाळपणा की मोठ्या कटाचा भाग?
या घटनेनंतर विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही चिठ्ठी कोणी ठेवली, त्यामागे नेमका उद्देश काय होता आणि हा प्रकार केवळ खोडसाळपणातून करण्यात आला की त्यामागे कोणता मोठा कट आहे, याचा तपास सुरू आहे. (Pune International Airport)सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू :
पोलिसांनी विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून विमानात प्रवेश केलेल्या प्रत्येक प्रवाशाची माहिती पडताळली जात आहे. संबंधित चिठ्ठी ठेवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपासासह विविध पथके कामाला लागली आहेत. (Pune International Airport)
Mira Road Forced Conversion : लग्नाचे आमिष, धर्मांतराची सक्ती अन् अमानुष मारहाण! मिरा रोडमध्ये हिंदू तरुणीसोबत घडला संतापजनक प्रकार
मुंबई (Mira Road Forced Conversion Case) : मुंबईलगतच्या मिरा रोड (Mira Road) परिसरातील काशीमीरा येथे एका हिंदू तरुणीची मुस्लिम युवकाकडून लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची ...





