Mumbai - Mandwa Ro-Ro Service : मुंबई - मांडवा प्रवाशांसाठी पावसाळ्यातही रो-रो सेवा नियमित

मुंबई : पावसाळ्यात मुंबई–मांडवा रो-रो सेवा (Mumbai - Mandwa Ro-Ro Service) कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहावी यासाठी मांडवा बंदरातील गाळ काढण्याचे काम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. बंदरात साचलेल्या सुमारे ६६ हजार घनमीटर गाळाच्या उपशासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत असून, त्यामुळे रो-रो आणि प्रवासी जलवाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत होणार आहे.


मुंबई–मांडवा मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र गेल्या काही वर्षांत बंदरात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने रो-रो बोटींना आणि प्रवासी जहाजांना बंदरात प्रवेश करताना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे अनेकदा रो-रो सेवेचे वेळापत्रक विस्कळीत होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. (Mumbai - Mandwa Ro-Ro Service)



मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन वर्षांपासून बंदरातील गाळ काढण्यात आलेला नव्हता. त्यामुळे बंदरातील पाण्याची खोली कमी होत चालली होती. विशेषतः ब्रेक वॉटर बंधाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्या भागात उच्च क्षमतेची ड्रेजिंग यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. (Mumbai - Mandwa Ro-Ro Service)


मांडवा बंदरातील गाळ काढण्याच्या आणि रो-रो वाहतुकीसाठी आवश्यक विविध कामांवर आतापर्यंत सुमारे २०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. चालू आर्थिक वर्षातही गाळ उपसा व डागडुजीसाठी एप्रिलमध्ये १ कोटी ६० लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. या निधीतून सुरू असलेले काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. (Mumbai - Mandwa Ro-Ro Service)



२६ मेपासून मान्सूनमुळे नियमित सागरी प्रवासी जलवाहतूक बंद राहणार असली तरी मुंबई–मांडवा रो-रो सेवा सुरूच राहणार आहे. त्यामुळे मुंबई आणि रायगड दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना पावसाळ्यातही अखंडित सेवा मिळणार आहे. (Mumbai - Mandwa Ro-Ro Service)

Comments
Add Comment

Ritu Tawde : मुंबईच्या महापौरांनी केली जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी; स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष घेतला आढावा

मुंबई : उंच लाटांमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या कचऱ्याबाबत वारंवार नागरी तक्रारी

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Nasha Mukti Kendra : राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात नशा मुक्ती केंद्र स्थापन करा!

- मुख्यमंत्र्यांचे निर्देश; 'ड्रग्ज फ्री महाराष्ट्रा'साठी सर्व विभाग एकत्रित काम करणार मुंबई : तरुण पिढीला

Devendra Fadnavis :मागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा, जलयुक्त शिवार ३.० मध्ये प्राधान्य मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंधारणाची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना निश्चित झालेल्या प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून

Hotel Radha Malad : मालाडमधील हॉटेल राधाचा FDA परवाना निलंबित; किचनमध्ये उंदीर, झुरळांचा सुळसुळाट

मुंबई : अस्वच्छतेविरोधात कारवाईचा बडगा उगारत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मालाड पश्चिम येथील हॉटेल राधाचा अन्न

Nitesh Rane : राज्याच्या खोल समुद्रात होणार 'मसल फार्मिंग'

- मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घेण्याचे निर्देश मुंबई : समुद्रातील