Prajakta Tanpure: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये प्रवेश

विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर मविआला मोठा धक्का


मुंबई : विधानपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम ऐन रंगात आलेला असतानाच महाविकास आघाडीला अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खंदे शिलेदार आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर 'कमळ' हाती घेतले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तनपुरे यांनी राहुरीचे नगराध्यक्ष आणि समर्थकांसह शनिवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.



राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतल्यापासूनच तनपुरे यांच्या राजकीय भूमिकेविषयी तर्कवितर्क लढवले जात होते, त्यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झाले असून, आगामी विधानपरिषद निवडणुकीत त्यांना अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अक्षय कर्डिले यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला होता. त्यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्याने भाजपचा मार्ग सुकर झाला होता. मात्र, त्याच निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या संवादानंतर तनपुरे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पोटनिवडणुकीतील माघारीचे 'फळ' म्हणून आता त्यांना भाजपकडून विधानपरिषदेच्या रिंगणात उतरवले जाण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १ जून असल्याने, पुढील २४ तासांत अहिल्यानगरच्या राजकारणाला अत्यंत अनपेक्षित वळण मिळण्याची शक्यता आहे.


मामांना सामोरे जाण्याची हिंमत नाही - तनपुरे


प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे सख्खे भाचे आहेत. त्यामुळे या पक्षांतराची राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा आहे. भाजप प्रवेशाविषयी बोलताना तनपुरे म्हणाले, "माझे मामा जयंत पाटील आणि आदरणीय शरद पवार यांना भेटायची माझ्यात हिंमत नाही, मी त्यांना याबाबत सांगितलेही नाही. मात्र, मतदारसंघातील अडचणी आणि ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर मी संघर्ष केला, त्यांच्या भावना लक्षात घेऊनच मला हा निर्णय घ्यावा लागला. सध्याच्या स्थितीत बोलणे देखील कठीण झाले आहे."


आमच्यासाठी धक्का - जयंत पाटील


प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशावर त्यांचे मामा जयंत पाटील म्हणाले, "प्राजक्त यांच्या भाजप प्रवेशाची माहिती मला काही वेळापूर्वीच मिळाली. माझा आणि त्यांचा कोणताही संपर्क झालेला नाही. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणे आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे. मतदारसंघातील स्थानिक परिस्थिती पाहून त्यांनी हा निर्णय घेतला असावा," अशी सावध प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
Comments
Add Comment

BMC : लालबागमधील मानाचे गणपती परिसरातील पदपथांवरील अतिक्रमण हटवली; तब्बल ६ अनधिकृत दुकानांसह ४३ फेरीवाल्यांवर कारवाई

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागाकडून कारवाई Mumbai : पदपथ अडथळामुक्त करुन पादचाऱ्यांसाठी सुलभ

Ritu Tawde : तुमची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही; महापौरांनी विरोधकांना भरला दम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका सभागृहात विरोधकांकडून अपशब्द वापरत गैरवर्तन केल्यानंतर महापौरांचा

BMC Pedestrian First Initiative : दहिसर-बोरिवली परिसराची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांनी केली पाहणी

पदपथांवरील अतिक्रमणे तातडीने हटवून पादचाऱ्यांसाठी अडथळामुक्त मार्गिका मुबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती

Ritu Tawde : मुंबईच्या महापौरांनी केली जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी; स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष घेतला आढावा

मुंबई : उंच लाटांमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या कचऱ्याबाबत वारंवार नागरी तक्रारी

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती