Crime News : धार्मिक सप्ताहात अल्पवयीन मुलीची छेडछाड ; जाब विचारणाऱ्या मावस भावालाही मारहाण

अहिल्यानगर : पाथर्डी ( Pathardi ) तालुक्यातील एका गावात सुरू असलेल्या धार्मिक सप्ताहादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. धार्मिक सप्ताह कार्यक्रमातच १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडितेच्या मावस भावालाही आरोपीने मारहाण केली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




नेमकं प्रकरण काय ?


पाथर्डी शहरालगतच्या एका गावात धार्मिक सप्ताह सुरू असून २६ मे रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित १४ वर्षीय मुलगी आपल्या आजीसोबत सप्ताह मंडपात उपस्थित होती. त्यावेळी गावातीलच एका अल्पवयीन मुलाने मुलीचा हात धरून तिची छेडछाड केली. या प्रकाराला मुलीने विरोध करत झाडूने मारण्याची भीती दाखवल्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. (Pathardi Crime News)


मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे २७ मे रोजी आरोपी पुन्हा सप्ताहाच्या ठिकाणी आला आणि पीडित मुलीला पैसे देण्याचा प्रयत्न केला. घडलेला प्रकार पीडितेने तिच्या मावस भावाला सांगितल्यानंतर २८ मे रोजी सकाळी संबंधित भावाने आरोपीला जाब विचारला. यावेळी आरोपीने शिवीगाळ करत त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतरही आरोपीची दादागिरी सुरूच राहिली.




पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल


२८ मे रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास सप्ताह मंडपात पीडित मुलीने आरोपीला तिच्या मावस भावाला दाखवले असता आरोपीने संतापून भावाची गचांडी धरून त्याला जमिनीवर ढकलले. “तू कोण लागून गेला?” असे म्हणत आरोपीने सार्वजनिक मंडपातच अल्पवयीन मुलीचा हात धरून तिला स्वतःकडे ओढले. मावस भावाने विरोध केल्यानंतर आरोपीने मुलीचा हात सोडला. या प्रकारानंतर पीडित मुलगी, तिचे वडील, नातेवाईक व ग्रामस्थ यांनी पाथर्डी पोलीस ठाणे (Pathardi Police Station) गाठून तक्रार दाखल केली. हा संपूर्ण घटनाक्रम पीडितेने फिर्यादीमध्ये मांडला आहे.


पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल (Pathardi Police Station)  करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधासाठी दोन विशेष पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात अली आहेत.

Comments
Add Comment

BMC : लालबागमधील मानाचे गणपती परिसरातील पदपथांवरील अतिक्रमण हटवली; तब्बल ६ अनधिकृत दुकानांसह ४३ फेरीवाल्यांवर कारवाई

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागाकडून कारवाई Mumbai : पदपथ अडथळामुक्त करुन पादचाऱ्यांसाठी सुलभ

Ritu Tawde : तुमची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही; महापौरांनी विरोधकांना भरला दम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका सभागृहात विरोधकांकडून अपशब्द वापरत गैरवर्तन केल्यानंतर महापौरांचा

BMC Pedestrian First Initiative : दहिसर-बोरिवली परिसराची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांनी केली पाहणी

पदपथांवरील अतिक्रमणे तातडीने हटवून पादचाऱ्यांसाठी अडथळामुक्त मार्गिका मुबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती

Ritu Tawde : मुंबईच्या महापौरांनी केली जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी; स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष घेतला आढावा

मुंबई : उंच लाटांमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या कचऱ्याबाबत वारंवार नागरी तक्रारी

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती