BMC : लालबागमधील मानाचे गणपती परिसरातील पदपथांवरील अतिक्रमण हटवली; तब्बल ६ अनधिकृत दुकानांसह ४३ फेरीवाल्यांवर कारवाई

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागाकडून कारवाई


Mumbai : पदपथ अडथळामुक्त करुन पादचाऱ्यांसाठी सुलभ करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून 'पादचारी प्रथम' अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत, ‘एफ दक्षिण’ विभागाकडून लालबाग परिसरातील विविध मानाचे गणपती आणि आसपासच्या परिसरातील पदपथांवर अडथळा निर्माण करणाऱ्या ०६ अनधिकृत दुकानांसह ४३ अनधिकृत फेरीवाल्यांचे बुधवारी १९ ऑगस्ट २०२६ रोजी कारवाई करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांच्या नेतृत्वात पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी महानगरपालिकेकडून 'पादचारी प्रथम' अभियान राबविण्यात येत आहे.




 


उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त (एफ दक्षिण विभाग) वृषाली इंगुले यांच्या नेतृत्वात ‘एफ दक्षिण’ विभागाकडून लालबाग परिसरात कारवाई करण्यात आली. या कारवाईत लालबाग परिसरातील मानाचे गणपती व आसपासचा परिसर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गालगतच्या पदपथांवर अडथळा निर्माण करणारी ०६ अनधिकृत दुकाने, २४ तात्पुरते ताडपत्रीचे शेड, ०३ अनधिकृत कट्टे आणि ४३ फेरीवाल्यांवर बुधवारी कारवाई करण्यात आली. तसेच, या परिसरात स्वच्छताही करण्यात आली. यावेळी काळाचौकी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. दरम्यान, पादचाऱ्यांना मार्गक्रमण करण्यासाठी पदपथ सुलभ आणि सुरक्षित राहावेत. पदपथांवर अनधिकृत बांधकामे निर्माण करुन अथवा साहित्य ठेवून अडथळा निर्माण करू नयेत. अन्यथा, कठोर कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Mumbai Port Global Partnership : मुंबईच्या सागरी विकासाला वेग; क्रूझ पर्यटनापासून जहाजबांधणीपर्यंत जागतिक गुंतवणुकीच्या संधी

मुंबई : मुंबई बंदर प्राधिकरणाने (MbPA) व्यापार, पर्यटन आणि बंदराधारित विकासाला नवी दिशा देत क्रूझ पर्यटन, मरिना

Ritu Tawde : तुमची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही; महापौरांनी विरोधकांना भरला दम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका सभागृहात विरोधकांकडून अपशब्द वापरत गैरवर्तन केल्यानंतर महापौरांचा

BMC Pedestrian First Initiative : दहिसर-बोरिवली परिसराची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांनी केली पाहणी

पदपथांवरील अतिक्रमणे तातडीने हटवून पादचाऱ्यांसाठी अडथळामुक्त मार्गिका मुबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती

Ritu Tawde : मुंबईच्या महापौरांनी केली जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी; स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष घेतला आढावा

मुंबई : उंच लाटांमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या कचऱ्याबाबत वारंवार नागरी तक्रारी

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Nasha Mukti Kendra : राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात नशा मुक्ती केंद्र स्थापन करा!

- मुख्यमंत्र्यांचे निर्देश; 'ड्रग्ज फ्री महाराष्ट्रा'साठी सर्व विभाग एकत्रित काम करणार मुंबई : तरुण पिढीला