Thalapathy Vijay : थलपती विजयचा मुलगा करणार चिटपटसृष्टीत पदार्पण 'या' तारखेला रिलीज होणार पहिला चित्रपट!

थलपती विजय हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठे नाव. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीच त्यांनी अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेतली. आता ते मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व करत आहेत. तर थलपती विजय यांचा मुलगा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. लवकरच त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शित होत आहे.


थलपती विजय उर्फ जोसेफ विजय यांचा मुलगा जेसन संजय हा चिटपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. त्याने दिग्दर्शित केलेला 'सिगमा' हा चित्रपट ३१ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.



जोसेफ विजयच्या मुलाचा हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे आणि त्यात कोणते कलाकार आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊ...


कधी रिलीज होणार?


'सिगमा'च्या निर्मात्यांनी घोषणा केली की, या चित्रपटात संदीप किशन हे आपल्याला मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ३१ जुलै रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचा मुलगा जेसन संजय (Jason Sanjay) याच्या दिग्दर्शनाखालील पहिला चित्रपट आहे. त्याने चित्रपटाचं लेखनही केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती लिसा प्रॉडक्शनचे (Lyca Productions) प्रमुख सुभास्करन यांनी केली आहे.



या चित्रपटात अॅक्शन, कॉमेडी, ट्रेझर-हंट असं भन्नाट समीकरण पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना खूपच चांगला सिनेमॅटिक अनुभव मिळेल.


'सिगमा' या चित्रपटात संदीप किशनबरोबर फरिया अब्दुल्ला, राजु सुंदरम, संपथ राज, शिव पंडीत, अन्बू थासन, योग जपी, मगलक्ष्मी, शीला राजकुमार, कमलेश आणि किरण कोंडा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसेच कलील राजा, संजीव एस आणि अजय अशोक यांनी अतिरिक्त पटकथा लेखक म्हणून काम केले आहे.



तांत्रिक बाजूंबद्दल बोलायचं झाल्यास,'सिगमा' या चित्रपटाला थामन एस (Thaman S) यांनी संगीत दिले आहे. चित्रपटाचं छायांकन कृष्णन वसंत यांनी केलं असून, एडिटींग प्रवीण केएल यांनी केली आहे. 'सिगमा'चं शूटिंग चेन्नई, थायलंड, थालकोना आणि सालेमसह अनेक ठिकाणी पूर्ण झालं आहे. मात्र, चित्रपटाला अद्याप सेन्सॉरकडून प्रमाणपत्र मिळालेले नाही. विशेष म्हणजे, विजय यांचा अखेरचा चित्रपट 'जन नायगन' च्याही सेन्सॉर प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत आणि चित्रपटाच्या रिलीज डेटची प्रतीक्षा आहे. काही रिपोर्टनुसार, 'जन नायगन' जूनच्या मध्यात प्रदर्शित होऊ शकतो. मात्र, निर्मिती संस्था केविन प्रॉडक्शन(KVN Productions) यांनी याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

Comments
Add Comment

TV : टीव्ही चॅनेलवरील जाहिरातींची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त; नवा नियम लागू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टीव्ही चॅनेलवर जाहिराती प्रसारित करण्याची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त केली आहे.

Poonam Dhillon : अभिनेत्री पूनम ढिल्लोंला डेंग्यूची लागण; लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : मुंबईत सध्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना मनोरंजनविश्वातील काही अभिनेत्रीही या आजाराच्या

Upcoming Reality Shows : सलमान - माधुरीसह प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणखी ३ कलाकारांचा रिअॅलिटी शोच्या माध्यमातून कमबॅक

मुंबई : १९६५ ते १९७० या काळात जन्मलेल्या ‘झेन एक्स’ पिढीतील अनेक सेलिब्रिटींनी ‘मिलेनियल्स’चे चित्रपट, मालिका

Samadhan Sarvankar : 'बेबी सरवणकर'चे आगमन! तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर झाले आई-बाबा

मुंबई : मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने

Maharashtra Epstein Files Teaser : 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा टीझर रिलीज; खरात प्रकरणावर आधारित सिनेमाची उत्सुकता वाढली

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेत राहिलेल्या भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर आधारित

Kareena Kapoor Pregnancy : करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? नणंद सबा पटौदीने अखेर मौन सोडलं

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या कथित तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर