Pune News : पुण्यात धक्कादायक प्रकार! दापोडी - फुगेवाडी परिसरातील ८ जणांचा एकाच दिवशी मृत्यू

पुणे : पिंपरी-चिंचवडमधून (Pimpri-Chinchwad) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील दापोडी-फुगेवाडी परिसरातील तब्बल ८ नागरिकांचा एकाच दिवशी संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे याच भागातील आणखी दोघांवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांकडून (Doctor) देण्यात आली आहे. त्यामुळे या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.


एकाचवेळी ८ नागरिकांचा मृत्यू कसा झाला? याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. मृत झालेल्या सर्व व्यक्ती या एकाच परिसरात (Area) राहणाऱ्या असल्याचं समोर आलं आहे. स्थानिक नागरिकांनी बंदी असलेली हातभट्टीची गावठी दारू प्यायल्याने हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. संबंधित नागरिकांना बेशुद्ध पडणे, चक्कर येणे किंवा फिट येणे अशा स्वरूपाचा त्रास झाल्यामुळे रुग्णालयात दाखल केले होते आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.



दरम्यान, दापोडी-फुगेवाडी परिसरातील अवैध दारूविक्रीवर कारवाई का होत नाही? पोलीस (Police) इतके गाफील कसे राहिले? असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महापौर योगेश बहल यांनी उपस्थित केला आहे. या सर्व मृत्यूमागचं नेमकं कारण पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.


अकबर पठाण याला काल रात्री घरात चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असताना आज त्याचा मृत्यू झाला. अकबरला दारू पिण्याची सवय होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.



त्यानंतर राजू प्रकाश राठोड आणि विजय प्रकाश राठोड यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली. विजयला कामाच्या ठिकाणी चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विजयच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर राजूला फिट आली. त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याचाही मृत्यू झाला. राजेश राजपूत याला सकाळी बाथरूममध्ये (Bathroom) चक्कर आली होती. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. विशेष म्हणजे राजेश राजपूत, राजू प्रकाश राठोड आणि विजय प्रकाश राठोड यांना दारूचं व्यसन नव्हतं.



एकाच भागातील नागरिकांचे एकाच दिवशी संशयास्पद मृत्यू (Death) झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या मृत्यूमागे विषारी दारूचं कारण आहे की इतर काही कारणं आहेत? याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे पोस्टमार्टम रिपोर्टकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



मृतांची नावे :


१) पांडुरंग फुगे
२) विजय प्रकाश राठोड
३) राजेंद्र प्रकाश राठोड
४) राजू राजपूत
५) अकबर पठाण
६) बाबा शेख
७) आनंद देसाई
८) आनंद निकाळजे


उपचार घेत असलेल्यांची नावे :


१) सुभाष डिगीकर – मेडी पॉईंट हॉस्पिटल

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान

Energy and Nanotechnology : पुणे आणि मुंबई विद्यापीठांचा अनोखा उपक्रम; ऊर्जा आणि नॅनोटेकनॉलॉजीमध्ये संयुक्त एमटेक अभ्यासक्रम सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि मुंबई विद्यापीठ (MU) यांच्यातर्फे संयुक्त पदव्युत्तर तंत्रज्ञान

Pandavkada Waterfall : पावसाळी सहल ठरली जीवघेणी; कुर्ल्यातील १६ वर्षीय मुलाचा खारघरमधील पांडवकडा धबधब्यात बुडून मृत्यू

नवी मुंबई : खारघरमधील पांडवकडा धबधब्यात मंगळवारी संध्याकाळी एका १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. या

Nitesh Rane : श्रीवर्धन तालुक्यातील मच्छिमार बांधवांवरील गुन्हे मागे घेणार

- मंत्री नितेश राणे; खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक मुंबई : रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल

Deemed Conveyance : राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या 'डीम्ड कन्व्हेअन्स'चा मार्ग मोकळा

- मालमत्ता पत्रक आणि सातबारावर सोसायटीच्या नावाची नोंद होणार - स्वयंपुनर्विकासासाठी प्रोत्साहन आणि कर सवलतींची

Dhiraj Kalawate Organ Donation : धिरजचा श्वास थांबला पण अवयवदानातून अनेकांचे श्वास राहणार सुरू

अमरावती : एका आठवड्यापूर्वी, आपल्या मित्रांसोबत केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देऊन आनंदाने घरी परतलेल्या ३०