Mumbai : ऋषभ पंतने आयपीएल २०२६ मधील निराशाजनक हंगामानंतर लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी फ्रँचायझीकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पंतने स्वतः कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती आणि एलएसजी व्यवस्थापनाने ती तात्काळ स्वीकारली अशी माहिती लखनऊने आपल्या सोशल मीडियावरून कळवले आहे.
LSG ने अधिकृत निवेदनात म्हटलं की,
ऋषभ पंतने कर्णधारपद सोडण्याची विनंती केली होती. आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करत ती स्वीकारली आहे. आता नव्याने संघ उभारणीवर आमचं लक्ष असेल.
27 कोटींचा स्टार, पण विफलता
आयपीएल २०२५ च्या आधी पंतला विक्रमी २७ कोटी रुपयांत संघात सामील करण्यात आले होते. मात्र सलग दोन हंगाम एलएसजी प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही.आयपीएल २०२६ मध्ये संघाने चौदापैकी केवळ चार सामने जिंकले आणि गुणतालिकेत दहाव्या स्थानावर घसरला.
मुंबई : आयपीएलच्या (IPL) आगामी हंगामापूर्वी क्रिकेटविश्वात एका मोठ्या ट्रेडची जोरदार चर्चा रंगली आहे. मुंबई इंडियन्सचा (MI) कर्णधार हार्दिक पांड्या ...
पंतची कामगिरी कशी होती?
या हंगामात पंतने १४ सामन्यांत ३१२ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३३.६१ आणि स्ट्राइक रेट १४६.७९ राहिला. हंगामाच्या सुरुवातीला सलामीवीर म्हणून उतरलेला पंत नंतर तिसऱ्या क्रमांकावर आणि अखेरीस मधल्या फळीत खेळताना दिसला होता. आरसीबी विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने शतक झळकवले. ही खेळी त्याच्या या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ठरली.
Official announcement. pic.twitter.com/7WeOwpkDr6
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 29, 2026
पुढचा कर्णधार कोण?
पंतच्या राजीनाम्यानंतर आता Aiden Markram आणि Mitchell Marsh यांची नावं पुढील कर्णधारपदासाठी चर्चेत आली आहेत. दरम्यान, क्रिकेट संचालक Tom Moody यांनीही नेतृत्वबदलाचे संकेत दिले होते. त्यांनी म्हटलं होतं की संघाला नवीन सुरुवात करण्याची गरज आहे.
मुंबई : अहमदाबाद (Ahemdabad) येथे होणाऱ्या आयपीएल (IPL) २०२६ च्या महामुकाबल्याचा थरार प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाऊन अनुभवू इच्छिणाऱ्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक ...
चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण
पंतच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही चाहत्यांनी पंतच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, तर काहींनी संघ व्यवस्थापनालाच अपयशासाठी दोषी ठरवले आहे.





