मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने आयपीएल दरम्यान खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांसाठी स्मार्ट सनग्लासेसच्या वापरावर बंदी घातली आहे. भ्रष्टाचारविरोधी युनिटने (ACU) १८ मे रोजी सर्व फ्रँचायझींना यासंदर्भात पत्र जारी केले आहे.
ड्रेसिंग रूममध्ये नो स्मार्ट डिव्हाइस
नवीन नियमांनुसार, सामन्याच्या दिवशी खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि अधिकाऱ्यांना मैदानातील ड्रेसिंग रूम किंवा डगआउटमध्ये जाण्यापूर्वी आपले फोन, स्मार्टवॉच आणि स्मार्ट सनग्लासेस सिक्युरिटी ऑफिसरकडे जमा करावे लागणार आहेत. नियम मोडल्यास कारवाई आणि दंडही करण्यात येईल.
The BCCI's Anti Corruption and Security Unit has banned the use of any smart goggles or smart sunglasses. - It’s been classified as Audio, Video recording and communication device. pic.twitter.com/9H93tuAPf1
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 29, 2026
बीसीसीआयने स्मार्ट सनग्लसासेसवर का घातली बंदी ?
BCCI च्या मते, स्मार्ट सनग्लासेस हे फक्त चष्मे नसून एक प्रकारचे कम्युनिकेशन डिव्हाइस आहेत. यामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग,टेक्स्ट मेसेजिंग.ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग,रेकॉर्डिंग,वाय-फाय आणि मोबाइल डेटा कनेक्टिव्हिटी यांसारख्या सुविधा असतात. त्यामुळे सामन्याशी संबंधित संवेदनशील माहिती लीक होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे बीसीसीआयने ही बंदी घातली आहे..
Mumbai : तब्बल पाच वेळा आयपीएल जिंकलेली मुंबई इंडियन्स सध्या मोठ्या संकटातून जात आहे. आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. ...
आयपीएल २०२६ मधील वादांनंतर BCCI सतर्क
स्मार्ट सनग्लासेसवर बंदी घालण्याच्या निर्णयामागे काही अलीकडील घटनाही कारणीभूत ठरल्या आहेत.
१. १० एप्रिलला राजस्थान रॉयल्सचे टीम मॅनेजर रोमी भिंडर आरसीबी विरुद्धच्या सामन्यात मोबाईल वापरताना दिसले होते.त्यावेळी बीसीसीआयने त्यांच्यावर कारवाई केली होती. बीसीसीआयने त्यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.
२. २८ एप्रिलला राजस्थानचा कर्णधार रियान पराग ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट वापरताना दिसला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
याशिवाय अनेकदा खेळाडूंचे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी प्रतिबंधित क्षेत्रात दिसल्यानेही बीसीसीआयने आता कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.
IPL मधील २०१३ च्या स्पॉट फिक्सिंगनंतर नियम अधिक कठोर
IPL २०१३ स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर बीसीसीआयने ACU अधिक मजबूत केलं. आता प्रत्येक संघासोबत एक सुरक्षा अधिकारी असतो, जो खेळाडूंच्या हालचाली आणि संपर्कांवर नजर ठेवतो. यंदा मॉनिटरिंग सिस्टममध्ये घुसखोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे बोर्डाने सुरक्षेचे नियम आणखी कठोर केले आहेत.





