Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी बनला विक्रमाचा बादशहा !

राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने एलिमिनेटर सामन्यात अक्षरशः विक्रमांचा पाऊस पाडला. त्याने २९ चेंडूंत १२ षटकार व ५ चौकारांसह ९७ धावांची खेळी करताना एका डावात तब्बल ९ मोठे विक्रम आपल्या नावावर केले. त्याच्या तुफानी खेळीमुळे राजस्थानला दमदार सुरुवात मिळालीच, शिवाय ऑरेज कॅपवरही त्याने कब्जा केला. वैभवने आयपीएलच्या प्लेऑफमधील सर्वात वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली. एका हंगामात सर्वाधिक षटकार, सर्वात कमी वयात ६०० धावा, पॉवरप्लेतील धडाकेबाज फटकेबाजी असे अनेक पराक्रम त्याने नोंदवले. वैभव सूर्यवंशीने आयपीएल इतिहासातील अविस्मरणीय खेळी एलिमिनेटर सामन्यात केली. त्याने सनरायर्झस हैदराबादच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि षटकारांचा पाऊस पाडून अनेक विक्रम नावावर केले. त्याने २९ चेंडूंत ५ चौकार व १२ षटकारांसह ९७ धावा कुटल्या आणि आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान शतकाच्या विक्रमापासून थोडक्यात हुकला. आयपीएलच्या एका पर्वात पहिल्या सहा षटकांत सर्वाधिक धावांचा विक्रमही वैभवने नावावर केला. त्याने या पर्वात आतापर्यंत ४९० धावा केल्या आहेत आणि डेव्हिड वॉर्नरचा ४६७ धावांचा ( २०१६) विक्रम आज मोडला गेला.



वैभव सूर्यवंशीचे विक्रम...


१६ चेंडू - आयपीएल प्ले ऑमधील वेगवान अर्धशतकाशी बरोबरी ( सुरेश रैना - १६ चेंडू वि. पंजाब किंग्स, २०१४)
८ षटकार - आयपीएलच्या एका डावात पहिल्या सहा षटकांत सर्वाधिक ८ षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्डही नावावर
६१ षटकार - आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक षटकारांचा ख्रिस गेलचा ( ५९) विक्रम मोडला
१२ षटकार - आयपीएल प्लेऑफमध्ये एका डावात सर्वाधिक १२ षटकारांचा विक्रम, शुभमन गिलचा ( १० वि. मुंबई, २०२३) विक्रम मोडला.
४ - आयपीएलच्या सर्वाधिक
४ डावांत १० पेक्षा अधिक षटकार मारण्याच्या ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी



एकाच हंगामात सर्वांधिक षटकार


वैभवने पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू षटकार भिरकावून पॅट कमिन्सला आश्चर्यचकीत केले आणि इशान मलिंगाच्याही षटकाचा शेवटचा चेंडू त्याने पूल शॉटने सीमापार पाठवला. वैभवने हा झंझावात कमिन्सच्या पुढील षटकात कायम राखताना तीन षटकार खेचले आणि आयपीएलच्या या पर्वात ६०० धावांचा टप्पा ओलांडला. आयपीएल इतिहासात एका पर्वात ६०० धावा करणारा तो युवा फलंदाज ठरला. त्याने रिषभ पंतचा ( २० वर्ष व २१८ दिवस,दिल्ली) २०१८ सालचा विक्रम मोडला. याशिवाय वैभवने आजच्या सामन्यात सात षटकार खेचून आयपीएल इतिहासात एकाच पर्वात सर्वाधिक ६० षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्डही नावावर केला. गेलने ५९ षटकार खेचले होते.
६०* - वैभव सूर्यवंशी (२०२६)
५९ - ख्रिस गेल (२०१२)
५२ - आंद्रे रसेल (२०१९)
५१ - ख्रिस गेल (२०१३)
४५ - जोस बटलर (२०२२)


Comments
Add Comment

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

ICC Rankings : हॅरी ब्रूकची कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

ICC Ranking : इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक पुन्हा एकदा आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत जगातील अव्वल

Rohit Sharma : रोहित शर्माचे जोरदार पुनरागमन; वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी मुंबईच्या बीकेसी मैदानावर सुरू केला सराव

वांद्रे : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा काही काळाच्या विश्रांतीनंतर मुंबईत परतला असून आगामी एकदिवसीय

BWF World Championships : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा धडाका; लक्ष्य, उन्नती विजयी, ट्रीसा-गायत्री उपउपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली : भारतात सुरू असलेल्या BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे.

Women's FIH Hockey World Cup : भारतीय महिलांचा विश्वचषकात धडाका; दक्षिण आफ्रिकेचा 6-1 ने धुव्वा, पुढची फेरी जवळपास निश्चित

ॲम्स्टेलवीन : FIH महिला हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 6-1 असा पराभव