SRH vs RR : राजस्थान रॉयल्सचा दणदणीत विजय, आता क्वालिफायर २ खेळणार

मुंबई : आयपीएलच्या (IPL) एलिमिनेटर (Eliminator) सामन्यात राजस्थान रॉयल्सने (RR) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) तब्बल ४७ धावांनी (Runs) पराभव करत क्वालिफायर-२ मध्ये धडक मारली आहे. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी (Batting) करताना २४३ धावांचा डोंगर उभा केला होता. या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची टीम १९६ धावांवर ऑलआऊट (All Out) झाली आणि राजस्थानने शानदार विजय मिळवला. आता राजस्थान रॉयल्सची टीम ३१ मे २०२६ रोजी नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध क्वालिफायर-२ सामना खेळणार आहे.


२४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात अत्यंत खराब झाली. आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला आणि हैदराबादला पहिलाच मोठा धक्का बसला. त्यानंतर ईशान किशन मैदानात आला. त्याने काही आकर्षक फटके खेळले, मात्र तो देखील मोठी खेळी करू शकला नाही आणि ३३ धावांवर माघारी परतला. ईशान बाद झाल्यानंतर स्मरण रविचंद्रनकडून अपेक्षा होत्या, पण तो फक्त १ धाव करून बाद झाला.



दुसऱ्या बाजूला ट्रॅविस हेड सावध फलंदाजी करत होता. त्यामुळे हैदराबादचा विजयाचा आशावाद कायम होता. मात्र ट्रॅविस हेड १७ धावांवर बाद झाला आणि तिथून हैदराबादची घसरगुंडी सुरू झाली. त्यानंतर हेन्री क्लासेन आणि नितीश रेड्डी ही जोडी मैदानात होती. क्लासेनकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती, पण तो १८ धावांवर बाद झाला. नितीश रेड्डीने काही काळ झुंज दिली, मात्र तो देखील ३८ धावांवर माघारी परतला.


यानंतर कर्णधार पॅट कमिन्स मैदानात आला. मात्र त्यालाही मोठी खेळी करता आली नाही आणि तो फक्त १ धाव करून बाद झाला. कॅप्टन बाद होताच हैदराबादच्या विजयाच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या होत्या. शेवटच्या फळीत सलील अरोराने ३५ धावांची झुंजार खेळी केली. शिवांग कुमारने २७ धावा केल्या, तर ईशान मलिंगाला ५ धावांवर बाद करण्यात आले. अखेर संपूर्ण हैदराबादची टीम १९६ धावांवर गारद झाली आणि राजस्थानने ४७ धावांनी दणदणीत विजय मिळवला.



दरम्यान, या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव नेमका कसा झाला? याबाबत आता सोशल मीडियावर (Social Media) मोठी चर्चा रंगली आहे. खरं तर या सामन्यासाठी हैदराबादने प्लेइंग इलेव्हनमध्ये (Playing 11) एक महत्त्वाचा बदल केला होता. प्रफुल हिंगेला टीममध्ये संधी देण्यात आली होती. हाच तो गोलंदाज आहे ज्याने ग्रुप स्टेजमध्ये वैभव सूर्यवंशीची विकेट (Wicket) घेतली होती. त्या वेळी हैदराबादचा कर्णधार (Captain) ईशान किशन होता.


मात्र आजच्या एलिमिनेटर सामन्यात पॅट कमिन्सने मोठी चूक केल्याचं बोललं जात आहे. कारण प्रफुल हिंगेला सुरुवातीपासून गोलंदाजी देण्यात आली नाही. विशेष म्हणजे पॉवरप्लेची (Powerplay) शेवटची ओव्हर टाकण्यासाठी हिंगेला संधी देण्यात आली आणि त्याने त्या ओव्हरमध्ये (Over) फक्त ६ धावा दिल्या. त्यानंतर आठव्या ओव्हरमध्ये त्याने वैभव सूर्यवंशीची महत्त्वाची विकेट घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. कारण वैभवने तब्बल ९७ धावांची स्फोटक खेळी केली होती.



क्रिकेट चाहत्यांच्या मते, जर पॅट कमिन्सने पहिल्याच ओव्हरला प्रफुल हिंगेला गोलंदाजी दिली असती, तर वैभव सूर्यवंशी लवकर बाद झाला असता. त्यामुळे राजस्थान रॉयल्सला मोठी धावसंख्या उभारता आली नसती. अनेकांचे मत आहे की वैभवची ९७ धावांची खेळीच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली. जर तो लवकर बाद झाला असता, तर राजस्थानची टीम १५० धावांच्या आत रोखली गेली असती आणि सनरायझर्स हैदराबादला हा सामना सहज जिंकता आला असता.


मात्र पॅट कमिन्सच्या रणनीतीतील एका चुकीमुळे राजस्थान रॉयल्सला मोठा फायदा झाला आणि सनरायझर्स हैदराबादने अक्षरशः पहिल्याच ओव्हरला सामना राजस्थानच्या हातात दिल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

IND vs SL Galle Test : भारतापाठोपाठ श्रीलंकाही पहिल्या डावात 'ऑलआऊट', जाणून घ्या गॉल कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे किती धावांची आघाडी ?

गॉल : पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सोनल दिनुषाच्या पहिल्यावहिल्या कसोटी शतकानंतरही भारतीय

Ind vs SL Test Match : श्रीलंकेवर फॉलोऑनची टांगती तलवार : लंकेच्या ४६२ धावांत ५ गडी बाद; टीम इंडियाच्या विजयात पावसाचा अडथळा?

Ind vs SL Test Match : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.

Cristiano Ronaldo : रोनाल्डोच्या निवृत्तीचे संकेत; २०२६-२७ हंगाम ठरू शकतो अखेरचा!

मुंबई : फुटबॉल विश्वातील महान खेळाडूंपैकी एक असलेला क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) लवकरच आपल्या २५ वर्षांच्या

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान