US Viral Video : US मध्ये भारतीयांशी गैरवर्तन; ‘आमच्या देशातून चालते व्हा’ म्हणत धमकावलं

अमेरिका : अमेरिकेत भारतीय जोडप्याशी कथित वांशिक टिप्पणी केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर संताप व्यक्त केला जात आहे. एका अनोळखी व्यक्तीने भारतीय दाम्पत्याला “तुमच्या देशात परत जा” असे म्हणत अमेरिका सोडण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा परदेशातील भारतीयांवरील वर्णद्वेष (Racism) आणि परकीय नागरिकांविरोधातील मानसिकतेचा मुद्दा चर्चेत आला आहे.



काय आहे नेमकं प्रकरण?


व्हायरल (Viral) झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कारमध्ये बसून भारतीय जोडप्याशी संवाद साधताना दिसते. सुरुवातीला ती व्यक्ती त्यांना ते भारतातून आले आहेत का, असा प्रश्न विचारते. भारतीय जोडप्याने होकार दिल्यानंतर ती व्यक्ती त्यांना “जर भारत इतका चांगला आहे, तर अमेरिकेत का आलात?” असा सवाल करते. यानंतर ती अधिक आक्रमक होत “आम्हाला तुम्ही इथे नको आहात, आमच्या देशातून निघून जा” अशा शब्दांत त्यांच्यावर संताप व्यक्त करताना दिसते. या संपूर्ण प्रकारात भारतीय जोडप्याने अत्यंत संयमाने प्रतिक्रिया दिली. त्यांनी कोणताही वाद न घालता आपण फक्त जग फिरण्यासाठी आलो असल्याचे शांतपणे सांगितले. मात्र, तरीही संबंधित व्यक्तीचा आक्रमक सूर कायम राहिल्याचे व्हिडिओमध्ये (Video) दिसून येते.







सोशल मीडियावर संताप, भारतीय जोडप्याचं कौतुक


हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक युजर्सनी या घटनेला वर्णद्वेष आणि झेनोफोबियाचे उदाहरण म्हटले आहे. भारतीयांना अशा प्रकारे लक्ष्य करणे चुकीचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे, संपूर्ण प्रसंगात शांतता आणि संयम राखल्यामुळे भारतीय जोडप्याचं सोशल मीडियावर कौतुकही होत आहे. काही युजर्सनी (Users) अशा घटनांवर गप्प राहणं धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे अशा मानसिकतेच्या लोकांचे मनोधैर्य वाढू शकते, अशीही चिंता व्यक्त केली जात आहे.



मार्को रुबिओ यांनाही केलं टॅग


व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी (Social Media Users) अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ (Marco Rubio) यांना टॅग (Tag) करत या प्रकरणात भूमिका घेण्याची मागणी केली आहे. रुबिओ यांनी यापूर्वी अमेरिकेत वांशिक टिप्पणी सहन केली जाणार नाही, असे वक्तव्य केले होते. दरम्यान, हा व्हिडिओ ज्या व्हेरिफाइड अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ती व्यक्ती स्वतःला म्युझिक प्रोड्युसर (Music Producer) असल्याचे सांगते. संबंधित अकाउंटवर (Account) यापूर्वीही भारतीयांची खिल्ली उडवणारे काही व्हिडिओ पोस्ट करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर भारतीयांविरोधातील कंटेंट वाढत असल्याची चिंता आता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Hayden Panettiere Passes Away : बालकलाकार ते हॉलीवूड स्टार! 'हिरोज' फेम अभिनेत्री हेडन पॅनेटीयरचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन

लॉस एंजिलीस : हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी 'हेडन

Indonesia Earthquake : इंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का; 5.7 तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीती

इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Indonesia Earthquake : इंडोनेशियात ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा, मोठी जीवितहानी

इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या पूर्व भागातील फ्लोरेस बेटाजवळ शनिवारी पहाटे ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप (Indonesia Earthquake)

Shehbaz Sharif News : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला धमकी, सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा गरळ ओकली

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित 'यादगार-ए-फतह' कार्यक्रमात बोलताना