NEET Paper Leak Case : NEET पेपरफुटी रॅकेटचा पर्दाफाश; १० ते १२ लाखांत विकला जात होता पेपर

लातूर : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील धागेदोरे आता लातूरमध्ये अधिकच मजबूत होताना दिसत आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (CBI) पथक गेल्या अनेक दिवसांपासून लातूरमध्ये तळ ठोकून आहे. मंगळवारी सीबीआयने या प्रकरणाशी संबंधित आणखी एका डॉक्टरची चौकशी केली. यासोबतच शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्या बॅचमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. या तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.



तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरसीसी क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर आणि एनटीएमधील केमिस्ट्री विषयाचा पेपर सेटर पी. व्ही. कुलकर्णी यांनी NEET परीक्षेचा पेपर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना लाखो रुपयांत विकल्याचा आरोप आहे. सीबीआयच्या हाती लागलेल्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदींमधून अनेक पालकांनी मोटेगावकर आणि कुलकर्णी यांच्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम हस्तांतरित केल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यवहारांचे डिजिटल पुरावे तपास यंत्रणेकडे उपलब्ध झाले आहेत.



सीबीआयच्या प्राथमिक तपासात पी. व्ही. कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर यांनी मिळून NEET परीक्षेचा पेपर तब्बल १०ते १२ लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या व्यवहारांशी संबंधित ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचे भक्कम पुरावे तपास यंत्रणेला मिळाले आहेत. विशेष म्हणजे, ज्यांनी हा पेपर खरेदी केला त्या काही पालकांनी पुढे आपल्या नातेवाईकांना आणि परिचितांना २ ते १० लाख रुपयांच्या मोबदल्यात तोच पेपर विकल्याची माहितीही समोर आली आहे. तपासात शहरातील काही नामांकित डॉक्टरांनी आपल्या मित्रांच्या आणि जवळच्या व्यक्तींच्या मुलांपर्यंत हा पेपर पोहोचवल्याचेही उघड झाले आहे.


ऑनलाईन व्यवहारांमुळे आरोपी अडचणीत


या संपूर्ण प्रकरणात डिजिटल व्यवहार आरोपींसाठी मोठी अडचण ठरत आहेत. अनेक पालकांनी पेपर खरेदीसाठी लागणारी रक्कम थेट ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केली होती. त्यामुळे प्रत्येक व्यवहाराची नोंद उपलब्ध असून सीबीआयला तपासासाठी महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. काही पालकांनी आपल्या पत्नींच्या किंवा मुलांच्या बँक खात्यांमधून थेट प्रा. कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर यांच्या खात्यावर पैसे पाठवले होते. या सर्व आर्थिक व्यवहारांची सध्या सखोल पडताळणी सुरू आहे.



दरम्यान, लातूर शहरातील नामांकित रुग्णालयांशी संबंधित पाच डॉक्टरांची सीबीआयने चौकशी केली आहे. यापैकी चार डॉक्टरांच्या मुलांनी यंदाची NEET परीक्षा दिली होती. स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय पुढे चालवण्यासाठी आपल्या मुलांनी डॉक्टर व्हावे, या इच्छेपोटी काही डॉक्टरांनी पेपर खरेदी केला असावा, असा संशय तपास यंत्रणेला आहे.


याशिवाय, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यांच्याकडून आणलेल्या प्रश्नपत्रिका जप्त करण्यात येत आहेत. कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्यांनी लिहून ठेवलेले प्रश्न आणि प्रत्यक्षात फुटलेले प्रश्न यांची तुलना करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक नोट्सही सीबीआयने ताब्यात घेतल्या आहेत. NEET पेपरफुटी प्रकरणातील संपूर्ण रॅकेट उघड करण्यासाठी सीबीआयचे पथक सध्या लातूरमध्ये कसून तपास करत असून येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली