Tuesday, May 26, 2026

Virat Kohli : प्लेऑफमध्ये विराट पुन्हा ठरणार फ्लॉप? आकडे पाहून RCB चाहत्यांची वाढली धाकधूक...

Virat Kohli : प्लेऑफमध्ये विराट पुन्हा ठरणार फ्लॉप? आकडे पाहून RCB चाहत्यांची वाढली धाकधूक...

IPL PLAYOFF : आयपीएल २०२६ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे. अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. या साामन्यात सर्वांचे लक्ष्य विराट कोहलीच्या कामगिरीवर असणार आहे. साखळी फेरीत विराटने अपेक्षाप्रमाणे संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. आरसीबीसाठी विराट यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणार फलंदाज आहे. मात्र विराट पेलऑफमध्ये अनेकदा चांगली कामगिरी करु शकला नाही आहे. त्यामुळे मोठ्या सामन्यापूर्वी आरसीबी चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे.

विराट कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 281 सामन्यांत 9,218 धावा केल्या आाहेत. तो स्पर्धेतील महान फलंदांजपैकी एक आहे. त्याच्या नावावर 9 शतके आणि 67 अर्धशतके आहेत. मात्र प्लेऑफमधील आकडे पाहिले तर चित्र थोडे वेगळे दिसत आहे. विराटने 17 प्लेऑफ सामन्यांत फक्त 396 धावा केल्या आहेत. यात त्याची सरासरी 26.40 इतकीच आहे. त्याने प्लेऑफ सामन्यात केवळ दोन अर्धशतके झळकावले आहेत. यात तो एकदा शून्यावरही बाद झाला आहे. त्यामुळे मोठ्या दबावाच्या सामन्यांत विराटची कामगिरी नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे.

यंदाचा हंगाम विराटसाठी खास ठरला आहे. त्याने 14 डावांत 557 धावा केल्या आहेक. तो आरसीबीच्या फलंदाजीचा कणा बनला आहे. 50 पेक्षा जास्तच्या सरासरी आणि 163 च्या स्ट्राइक रेटने खेळताना विराटने आक्रमक फलंदाजीचे नवे रूप दाखवले आहे. पॉवरप्लेमध्ये वेगवान सुरुवात देण्यापासून तर शेवटपर्यंत डाव सावरण्याची जबाबदारी त्याने उत्कृष्टपणे पार पाडली आहे.मात्र आजचा सामना सोपा नसेल. गुजरातकडे कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि राशिद खानसारखे अनुभवी गोलंदाज आहेत. यात रबाडाने विराटला अनेकदा अडचणीत टाकले आहे. त्यामुळे क्वालिफायरमध्ये विराटची बॅट चालते की पुन्हा प्लेऑफचा दबाव त्याच्यावर भारी पडतो, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >