Rohit Sharma : रोहित शर्मा पद्मश्री पुरस्कार सोहळ्याला गैरहजर; चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण, नेमकं कारण काय ?

ABSENCE IN PADMSHRI AWARD CEREMONY : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा 25 मे रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित पद्मश्री पुरस्कार सोहळ्यात अनुपस्थित राहिला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. यावर्षी भारत सरकारने रोहित शर्माला देशातील चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्काराने गौरवण्याची घोषणा केली होती.रोहितच्या अनुपस्थितीमुळे अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र, पद्म पुरस्कार समारंभ वेगवेगळ्या टप्प्यांत आयोजित केले जातो. त्यामुळे रोहित शर्मा पुढील समारंभात हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


भारतीय क्रिकेटमधील अद्भूत योगदान, दमदार नेतृत्व आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशस्वी कामगिरीची दखल घेत रोहित शर्मा आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. हरमनप्रीत कौरने व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत समारंभाला हजेरी लावली, मात्र रोहित उपस्थित राहू शकला नाही.



नेमकं कारण काय?


मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्माचा २५ मे रोजीच्या पहिल्या गटात समावेष्ट नव्हता. त्यामुळे तो पुढील टप्प्यात राष्ट्रपती भवनात अधिकृतपणे हा सन्मान स्वीकारणार असल्याची चर्चा आहे. २६ जानेवारीला रोहित शर्माच्या नावाची घोषणा पद्मश्री पुरस्कारासाठी झाली होती. त्याला पद्मश्री स्वीकारताना पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती. मात्र, समारंभात त्याची अनुपस्थिती पाहून सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, सरकारी नियोजन आणि वैयक्तिक वेळापत्रकानुसार अनेक मानकरी पुढील समारंभांमध्ये पुरस्कार स्वीकारतात, अशी माहिती समोर आली आहे.

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील