NEET Paper Leak Case : पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट! तीन शिक्षकांवर CBI कडून आरोपपत्र; लाखोंमध्ये प्रश्नफुटीचा घोटाळा उघड

नीट-युजी २०२६ (NEET-UG 2026) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग (Central Bureau of Investigation – CBI) लवकरच मोठी कारवाई करत आरोपपत्र (chargesheet) दाखल करण्याच्या तयारीत आहे. या आरोपपत्रात तीन शिक्षकांची नावे प्रमुख आरोपी म्हणून नमूद केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. (NEET Paper Leak Case)

या प्रकरणात रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांचे प्रश्न फोडल्याचा आरोप अनुक्रमे पी.व्ही.कुलकर्णी (P. V. Kulkarni), मनीषा मांढरे (Manisha Mandhare) आणि मनीषा हवालदार (Manisha Havaldar) यांच्यावर ठेवण्यात आला आहे. (NEET Paper Leak Case)


CBI कडून एका आठवड्यात आरोपपत्र :


सूत्रांच्या माहितीनुसार, CBI पुढील एका आठवड्यात, म्हणजेच लवकरच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करणार आहे. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण नेटवर्कमध्ये NTA-नियुक्त शिक्षक, कोचिंग सेंटरचे मध्यस्थ आणि स्थानिक एजंट्स यांचा संगनमताने सहभाग होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, “ही एक संघटित टोळी होती, ज्यांनी NEET-UG 2026 चे प्रश्न आधीच मिळवून विद्यार्थ्यांना लाखोंमध्ये विकले.” (NEET Paper Leak Case)

पेपरफुटीचे संपूर्ण नेटवर्क उघड :


CBI तपासात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये कोचिंग सेंटर चालक, मध्यस्थ आणि काही एजंट्सचा समावेश आहे. तपासात असेही समोर आले आहे की, काही शिक्षकांना NTA कडून पेपर तयार करण्याशी संबंधित जबाबदारी देण्यात आली होती आणि त्यांनीच ही माहिती बाहेर दिली. (NEET Paper Leak Case)


पेपरफुटीसाठी लाखोंचा व्यवहार :


CBI च्या माहितीनुसार, या रॅकेटमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडून लाखों रुपये घेऊन प्रश्न आणि उत्तरे दिली जात होती. काही ठिकाणी खास कोचिंग सेशन्स घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षा आधीच प्रश्न लिहून देण्यात आले. पी. व्ही. कुलकर्णी (P. V. Kulkarni) यांनी रसायनशास्त्राचे प्रश्न, मनीषा मांढरे (Manisha Mandhare) यांनी जीवशास्त्र (Botany/Zoology) तर मनीषा हवालदार (Manisha Havaldar) यांनी भौतिकशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा तपासात दावा करण्यात आला आहे. (NEET Paper Leak Case)


NTA अधिकाऱ्यांचा सहभाग अद्याप तपासाधीन :


विशेष म्हणजे या आरोपपत्रात अद्याप कोणत्याही नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) अधिकाऱ्याचे नाव समाविष्ट केले जाणार नाही. मात्र, तपास पूर्णपणे खुला ठेवण्यात आला असून पुढील काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (NEET Paper Leak Case)

CBI कडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉप, मोबाईल आणि कागदपत्रांची तपासणी सुरू असून त्याचा अहवालही आरोपपत्रात समाविष्ट केला जाणार आहे. त्यामुळे देशभरात गाजत असलेल्या NEET-UG पेपरफुटी प्रकरणाला आता निर्णायक वळण मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. (NEET Paper Leak Case)
Comments
Add Comment

Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा