Tuesday, May 26, 2026

14-day curfew in Pune : पुणेकरांनो लक्ष द्या! १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू? की इंधन बचतीसाठी नवा फतवा; आदेशामुळे गोंधळ

14-day curfew in Pune : पुणेकरांनो लक्ष द्या! १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू? की इंधन बचतीसाठी नवा फतवा; आदेशामुळे गोंधळ

पुणे : पुणे शहरात आजपासून जमावबंदी लागू झाल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंदोलन, मोर्चे आणि सभांवर बंदी घालण्यात आल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच प्रत्यक्षात पुणे महानगरपालिकेने इंधन बचतीसाठी महत्त्वाचे आदेश जारी केले असल्याचे समोर आले आहे. वाढते इंधन दर आणि महापालिकेच्या वाहनांवरील वाढता खर्च लक्षात घेता प्रशासनाने खर्च नियंत्रणासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. (14-day curfew in Pune)

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर (Prajit Nair) यांनी सर्व विभागप्रमुखांना यासंदर्भात तातडीच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेच्या वाहनांचा वापर केवळ अत्यावश्यक कामांसाठीच करावा, अनावश्यक फेऱ्या टाळाव्यात आणि इंधन बचतीला प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. (14-day curfew in Pune)

नेमके आदेश काय आहेत?

महापालिकेच्या आदेशानुसार, कार्यालयीन कामांसाठी वाहनांचा वापर काटेकोरपणे नियंत्रित करण्यात येणार आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दौरे करताना शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असे सांगण्यात आले आहे. मंत्रालय, उच्च न्यायालय किंवा इतर कार्यालयीन कामांसाठी एसटी, रेल्वे, मेट्रो किंवा सार्वजनिक बसचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. (14-day curfew in Pune)

तसेच, एकाच ठिकाणी जाणाऱ्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र वाहने वापरण्याऐवजी ‘कारपूलिंग’चा अवलंब करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. आठवड्यातून किमान एक दिवस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मेट्रो, लोकल किंवा सार्वजनिक बसने प्रवास करावा, अशी सूचनाही देण्यात आली आहे. (14-day curfew in Pune)

ऑनलाइन बैठकींना प्राधान्य :

इंधन बचतीसाठी महापालिकेने बैठका, प्रशिक्षण कार्यक्रम आणि चर्चासत्रे ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वाहनांचा वापर कमी होऊन खर्चात बचत होईल, असा प्रशासनाचा दावा आहे. (14-day curfew in Pune)

इंधन दरवाढीचा महापालिकेवर ताण :

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन वापरात काटकसर करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अनेक सरकारी विभागांकडून खर्च नियंत्रणाच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. पुणे महापालिकेवरही इंधन, वाहनांची देखभाल आणि चालकांवरील खर्चाचा मोठा आर्थिक भार पडत असल्याने प्रशासनाने आता बचतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. (14-day curfew in Pune)

दरम्यान, ‘जमावबंदी’ आणि ‘इंधन बचत आदेश’ याबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून मात्र हा निर्णय मुख्यतः इंधन बचतीसाठी आणि वाहन वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >