IPL 2026 Playoffs : आयपीएलच्या प्लेऑफला आजपासून सुरुवात! जाणून घ्या कोणता संघ ठरेल कोणावर वरचढ

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL 2026 आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून आजपासून प्लेऑफच्या थराराला सुरुवात होत आहे. लीग स्टेजमधील दमदार कामगिरीनंतर चार संघांनी अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. यामध्ये आरसीबी (Royal Challengers Bengaluru), गुजरात (Gujarat Titans), हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) आणि राजस्थान (Rajasthan Royals) या संघांचा समावेश आहे. (IPL 2026 Playoffs)



रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू : एक संतुलित संघ पण...


या चारही संघांमध्ये किंग कोहलीचा आरसीबी हा संघ सर्व बाजूने संतुलित वाटत आहे. Royal Challengers Bengaluru यंदा सर्वात संतुलित संघ म्हणून समोर आला आहे. फलंदाजीत विराट कोहली, फाफ डू प्लेसिससारखे अनुभवी खेळाडू तर गोलंदाजीत डेथ ओव्हर्समध्ये अचूक मारा करणारे बॉलर्स हे RCB चे मोठे बलस्थान ठरले आहे. (IPL 2026 Playoffs)



मजबूत टॉप ऑर्डर, अनुभवी खेळाडू आणि पॉवरप्लेमध्ये आक्रमक सुरुवात ही बंगळुरू संघाची जमेची बाजू आहे. तर दुसरीकडे मधल्या फळीत सातत्याचा अभाव, मोठ्या सामन्यात दबावाखाली चुका होण्याची भीती ही त्यांची कमजोरी ठरू शकते. (IPL 2026 Playoffs)



गुजरात टायटन्स : शांत पण धोकादायक


गुजरात टायटन्सने पुन्हा एकदा शांतपणे प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. या वर्षी या संघाची गोलंदाजी आणि संकटात सामना फिरवण्याची क्षमता ही सर्वात लक्षणीय ठरली आहे. तसेच मजबूत बॉलिंग अटॅक, फिनिशर्सची ताकद आणि कर्णधाराची शांत रणनीती ही संघाची जमेची बाजू आहे तर दुसरीकडे टॉप ऑर्डर लवकर कोसळल्यास अडचण, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना दबाव या गोष्टींमुळे हा संघ अडचणीत येऊ शकतो. (IPL 2026 Playoffs)



सनरायझर्स हैदराबाद : सर्वात आक्रमक संघ


सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) हा संघ यंदा विस्फोटक फलंदाजीमुळे चर्चेत राहिला आहे. या हंगामात पॉवरहिटिंगच्या जोरावर अनेक सामने त्यांनी एकहाती जिंकले आहेत. धडाकेबाज ओपनर्स, मोठ्या स्कोअरची क्षमता आणि सुरुवातीपासून आक्रमक खेळ ही या संघाची ताकद आहे. तर गोलंदाजीमध्ये सातत्य नसणे, दबावात मधली फळी ढासळने ही या संघाची कमजोरी आहे. (IPL 2026 Playoffs)



राजस्थान रॉयल्स : युवा जोश आणि स्पिनची ताकद


राजस्थानच्या युवा खेळाडूंनी यावेळी संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलून धरली आहे. उत्कृष्ट स्पिन अटॅक, युवा खेळाडूंची आक्रमकता आणि मोठे सामने जिंकण्याची क्षमता ही या संघाची जमेची बाजू आहे तर, फलंदाजीत सातत्याचा अभाव, डेथ ओव्हर्समध्ये रन रोखण्यात अडचण येणे यामुळे या संघाची विजयाची स्वप्न काहीशी धूसर ठरू शकतात. (IPL 2026 Playoffs)



गुजरात की आरसीबी; कोणाला मिळणार फायनलचं तिकीट ?


आज होणाऱ्या RCB आणि गुजरात यांच्यातील Qualifier 1 वर सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण हा सामना जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये पोहोचणार आहे. तर Eliminator मध्ये पराभूत होणाऱ्या संघाचा प्रवास संपणार आहे. त्यामुळे प्रत्येक सामना आता ‘करो या मरो’ असा असणार आहे. (IPL 2026 Playoffs)



प्लेऑफचे सामने कधी?


Qualifier 1 : आरसीबी vs गुजरात टायटन्स - मंगळवार २६ मे
Eliminator : सनरायझर्स हैदराबाद vs राजस्थान रॉयल्स - बुधवार २७ मे
Qualifier 2 : २९ मे
Final : ३१ मे, अहमदाबाद

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील