Crime News : उसाच्या शेतातील 'ते' दृश्य पाहून सर्वच हादरले , ५५ वर्षीय महिलेला...

Kolhapur Crime News : कोल्हापूरमध्ये ५५ वर्षीय विधवा महिलेचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. शेतात औषध फवारण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय छबूताई सर्जेराव पाटील यांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे रविवारी ही भयंकर घटना घडली. या प्रकरणाची पन्हाळा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास छबूताई पाटील या मासुलकी नावाच्या शेतावर उसावर औषध फवारणी करण्यासाठी गेल्या होत्या. पतीचे निधन झाल्याने आणि मुलगा बाहेरगावी असल्याने शेतीची सर्व कामे त्याच करत होत्या. तसेच गावातल्या घरी त्या एकट्याच राहत होत्या. रविवारी दारात घातलेलं वाळवण तसंच होतं आणि दरवाजा देखील बंद होता. त्यामुळे शेजाऱ्यांनी चौकशी सुरू केली. मात्र, रात्री उशीर झाला तरी फोन उचलत नसल्याने पुतणे आणि नातेवाईकांनी छबूताई पाटील यांचा शोध सुरू केला. (Kolhapur Crime News )



छबूताई पाटील फोनही उचलत नसल्याने नातेवाईक चिंतेत आले. छबूताई या शेतात गेल्याचे समजल्यानंतर नातेवाईकांनी शेतात जाऊन शोध सुरू केला. दरम्यान , नातेवाईकांना शेताच्या बांधावर औषधाने भरलेला पंप, चप्पल आढळले. त्यानंतर देखील पुतण्याने फोन केला. तेव्हा उसातून फोनचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तर शेताच्या मध्यभागी उसाच्या सरीत त्यांचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह आढळला.


छबूताई यांच्यावर अज्ञाताने धारदार शस्त्राने वार केले होते. खून करून चेहरा कापडाने झाकलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे अत्याचार करून खून केला आहे का? अशी उलटसुलट चर्चा परिसरात होतेय. तर या घटनेची माहिती मिळताच मुलाने केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. छबूताई यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. याप्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

Comments
Add Comment

Upcoming Web Series : सचिन तेंडुलकरच्या जिवलग मित्राची कहाणी लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; प्रमुख भूमिकेत कोण ?

मुंबई : क्रिकेट विश्वात काही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा त्यांच्या खेळातील विक्रमांपेक्षाही अधिक झाली.

Mahad Gas Leak : महाड एमआयडीसीत गॅस गळती; इंडो अमाईन्समधील दोघांचा मृत्यू, ३४ कामगारांची तब्येत बिघडली

महाड : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमध्ये इंडो अमाईन्स कंपनीमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची

Sonia Gandhi : ‘वंदे मातरम’च्या अपमानावरून सोनिया गांधींविरोधात तक्रार दाखल

कर्नाटक : ‘वंदे मातरम’च्या अपमानावरून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान