Petrol-Diesel Price Hike : पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं! सलग चौथ्यांदा झाली दरवाढ

नवी दिल्ली : देशभरातील वाहनधारकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये ११ दिवसांत चौथ्यांदा वाढ करण्यात आली आहे. (Petrol and Diesel Price Hike) आज २५ मे २०२६ रोजी सकाळी इंधनाच्या दरात वाढ (Price Hike) जाहीर झाली. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईसह अनेक प्रमुख शहरांमध्ये इंधनाचे दर आणखी वाढले आहेत. नव्या दरांची अंमलबजावणी आज सकाळी ६ वाजल्यापासून करण्यात आली.


यामुळे खासगी वाहनचालकांसह वाहतूक क्षेत्रावरही अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात ३ रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली असून डिझेलही महागले आहे. राजधानी दिल्लीत (New Delhi) पेट्रोल (Petrol) प्रतिलिटर २.६१ रुपयांनी वाढून १०२.१२ रुपये झाले आहे. तर डिझेलच्या (Diesel) दरात २.७१ रुपयांची वाढ झाल्याने ते ९५.२० रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. त्यामुळे वाहनाची टाकी भरताना ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.



प्रमुख शहरांतील आजचे पेट्रोल-डिझेल दर




  • दिल्ली : पेट्रोल १०२.१२ रुपये, डिझेल ९५.२० रुपये प्रतिलिटर

  • मुंबई : पेट्रोल १११.२१ रुपये, डिझेल ९७.८३ रुपये प्रतिलिटर

  • कोलकाता : पेट्रोल ११३.४७ रुपये, डिझेल ९९.८२ रुपये प्रतिलिटर

  • चेन्नई : पेट्रोल १०७.७७ रुपये, डिझेल ९९.५५ रुपये प्रतिलिटर

  • बेंगळुरू : पेट्रोल ११०.६१ रुपये, डिझेल ९८.५४ रुपये प्रतिलिटर

  • नोएडा : पेट्रोल १०१.९२ रुपये, डिझेल ९५.३७ रुपये प्रतिलिटर

  • गुरुग्राम : पेट्रोल १०२.६९ रुपये, डिझेल ९५.३६ रुपये प्रतिलिटर

  • चंदीगड : पेट्रोल १०१.५४ रुपये, डिझेल ८९.४७ रुपये प्रतिलिटर

  • लखनऊ : पेट्रोल १०१.८९ रुपये, डिझेल ९५.३६ रुपये प्रतिलिटर

  • पटणा : पेट्रोल ११३.५४ रुपये, डिझेल ९९.५४ रुपये प्रतिलिटर



दोन आठवड्यांत तब्बल ७.५० रुपयांहून अधिक वाढ


गेल्या दोन आठवड्यांत इंधन दरवाढीचा हा चौथा निर्णय आहे. १५ मे रोजी तब्बल चार वर्षांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर १९ मे आणि २३ मे रोजीही जवळपास ९० पैशांची वाढ करण्यात आली.



१५ मेपासून सुरू झालेल्या या दरवाढीच्या मालिकेमुळे आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये एकूण ७.५० रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या खिशावरील भार वाढण्याची शक्यता असून वाहतूक खर्च वाढल्याने इतर वस्तूंच्या किमतींवरही परिणाम होऊ शकतो.

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Marleshwar Temple : मार्लेश्वर मंदिरात तोकड्या व असभ्य कपड्यांमध्ये प्रवेशास बंदी

मार्लेश्वर देवस्थानचे पवित्र्य राखण्यासाठी देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय देवरूख : राज्यातील लाखो भाविकांचे