Pune Wife Murder Case : पतीने पत्नीच्या डोक्यात टाकला चक्क गॅस सिलिंडर; पतीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा !

पुणे : पुण्यात लेबर कॅम्पमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात ५ किलोचा गॅस सिलिंडर घालून तिची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आरोपी ने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन दिली गुन्ह्याची कबुली . त्यानंतर पोलिसानी ताबोडतोब तपास सुरू केला .


पुण्यातील येवलेवाडी परिसरात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. कौटुंबिक वाद आणि चारित्र्याच्या संशयावरून पती आणि पत्नी मध्ये झालं टोकाच भांडण . रागाच्या भरत पती ने पत्नी च्या डोक्यात टाकला ५ किलो वजनाचा सिलेंडर . ही घटना बांधकाम मजुरांच्या कॅम्पमध्ये (लेबर कॅम्प) घडली असून हत्येनंतर आरोपी पतीने स्वतःहून पोलीस ठाणे गाठत गुन्ह्याची कबुली दिली आहे.



कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल उचळले पतीने |


पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी पती आणि मृत महिला येवलेवाडी परिसरातील एका बांधकाम प्रकल्पाच्या लेबर कॅम्पमध्ये वास्तव्यास होते. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये काही क्षुल्लक कारणांमुळे जोरदार भांडण झाले. या भांडणादरम्यान पतीचा राग अनावर झाला आणि त्याने घरात असलेला पाच किलोचा वजनाचा गॅस सिलिंडर उचलून पत्नीच्या डोक्यात घातला. हा वार इतका भीषण होता की, गंभीर दुखापत झाल्याने महिलेचा मृत्यू झाला.



हत्येनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर |

आपल्या पत्नीची हत्या केल्यानंतर थेट जवळचे पोलीस ठाणे गाठले, केलेल्या गुन्ह्याची कबुलीही दिली. आरोपीने स्वतःहून गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे पोलीसही आश्चर्य चकित झाले . पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.



घटनास्थळी पोलिसांची धाव; तपास सुरू |


घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून पोस्टमार्टेमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.

">पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून हत्येसाठी वापरलेला सिलिंडर जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, या घटनेमुळे लेबर कॅम्पमधील कामगारांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

Tags
punecrimemurderpune murder casedomestic volience
Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व