Monday, May 25, 2026

Mumbai's Tourist in Uttarakhand : धक्कादायक! उत्तराखंडमध्ये मुंबईच्या पर्यटकांवर थरारक हल्ला, पोलिसांसमोरच दरीत ढकलून मारण्याचा प्रयत्न

Mumbai's Tourist in Uttarakhand : धक्कादायक! उत्तराखंडमध्ये मुंबईच्या पर्यटकांवर थरारक हल्ला, पोलिसांसमोरच दरीत ढकलून मारण्याचा प्रयत्न

मुंबई : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये उत्तराखंड फिरण्यासाठी गेलेल्या मुंबईतील पर्यटकांना अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे. मसुरी आणि कनाताल परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या ठाण्यातील एका कुटुंबावर स्थानिक वाहतूक सेवा पुरवणाऱ्या काही व्यक्तींनी कथितरित्या हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेमुळे उत्तराखंडमधील पर्यटक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Mumbai's Tourist in Uttarakhand)

जबरदस्तीने पैसे उकळण्याचा आरोप :

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील पर्यटक आपल्या ज्येष्ठ नागरिक वडिलांसह मसुरी–कनाताल महामार्गावरील प्रसिद्ध सुरकांडा माता मंदिर परिसरात गेले होते. यावेळी काही स्थानिक व्यक्तींनी त्यांना अडवून जबरदस्तीने पैसे मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. पर्यटकांनी याला विरोध करताच वाद वाढला आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली. (Mumbai's Tourist in Uttarakhand)

वादाच्या दरम्यान पर्यटकांवर दगडफेक करण्यात आली. एवढंच नाही तर आरोपींनी त्यांना डोंगराच्या खोल दरीत ढकलण्याचाही प्रयत्न केल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे. या घटनेमुळे पर्यटक आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. (Mumbai's Tourist in Uttarakhand)

पोलिसांसमोरच घडला धक्कादायक प्रकार :

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा संपूर्ण प्रकार कथितरित्या पोलिसांच्या उपस्थितीत घडला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जखमी पर्यटक पोलिसांकडे मदतीची विनंती करताना दिसत आहेत. दुसरीकडे दगडफेक करणारे आरोपी पोलिसांसमोर उभे असल्याचंही दिसत आहे. मात्र, एवढं सगळं घडूनही पोलिसांनी तत्काळ कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप पर्यटकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Mumbai's Tourist in Uttarakhand)

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप :

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. “पर्यटक सुरक्षित नसतील तर पर्यटन कसं वाढणार?” असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. काही सोशल मीडिया युजर्सनी उत्तराखंड सरकार आणि स्थानिक प्रशासनावर टीका करत पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. (Mumbai's Tourist in Uttarakhand)

स्थानिक व्हेंडरवर आरोप :

हा संपूर्ण प्रकार कथितरित्या क्लब महिंद्रा कनातालशी संबंधित स्थानिक व्हेंडरकडून घडल्याचं सांगितलं जात आहे. मात्र याबाबत अधिकृत स्तरावर अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. (Mumbai's Tourist in Uttarakhand)

दरम्यान, या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तराखंडमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्याने अनेक पर्यटकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.  (Mumbai's Tourist in Uttarakhand)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा