ब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी
Congress News : काँग्रेसचे चंद्रपुरातील ३९ हून अधिक नगरसेवक 'नॉट रिचेबल'
May 25, 2026 12:00 PM
- विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग
मुंबई : १८ जून रोजी होणाऱ्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या बालेकिल्ल्याला मोठा सुरुंग लागला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ५ नगर परिषदा आणि नगर पंचायतींमधील काँग्रेसचे ३९ हून अधिक नगरसेवक अचानक 'नॉट रिचेबल' झाले असून, ते अज्ञातस्थळी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.
Twisha Sharma Case : “समाज काय म्हणेल?”च्या भीतीने गमावला जीव? आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी
नवी दिल्ली : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ट्विशा शर्मा (Twisha Sharma Case) मृत्यू प्रकरणावर आज म्हणजेच सोमवार २५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी ...
वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांतील एकूण ९७७ मतदार विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गेल्या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर विदर्भातील ही पहिलीच मोठी स्थानिक निवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, पाच ठार
धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात होऊन पाच जण ठार झाल्याची घटना घडली आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लळिंग घाटात रविवारी पहाटे ही ...
">महायुतीकडून मते फुटू नयेत आणि महाविकास आघाडीची मते आपल्याकडे वळवता यावीत, यासाठी पडद्यामागे जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. काँग्रेसचे एवढ्या मोठ्या संख्येने नगरसेवक 'नॉट रिचेबल' झाल्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
IPPA : पोस्ट प्रॉडक्शन क्षेत्रातील कलाकारांना “कलाकाराचा दर्जा” द्यावा – IPPA ची शासनाकडे मागणी
मुंबई : चित्रपट, मालिका, जाहिराती, वेब सिरीज तसेच डिजिटल माध्यमांच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पोस्ट प्रॉडक्शन क्षेत्रातील ...
चंद्रपूर महापालिका आणि जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर काँग्रेसमध्ये वडेट्टीवार गट आणि धानोरकर गट अशी उघड रस्सीखेच पाहायला मिळाली होती. अगदी महापौर पदाच्या फॉर्म्युल्यावरूनही दोन्ही गटांत वाद दिल्लीदरबारी पोहोचला होता.
IPPA : पोस्ट प्रॉडक्शन क्षेत्रातील कलाकारांना “कलाकाराचा दर्जा” द्यावा – IPPA ची शासनाकडे मागणी
मुंबई : चित्रपट, मालिका, जाहिराती, वेब सिरीज तसेच डिजिटल माध्यमांच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पोस्ट प्रॉडक्शन क्षेत्रातील ...
">याच पक्षांतर्गत धुसफुशीचा आणि स्थानिक नेत्यांमधील नाराजीचा फायदा घेत सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांशी संपर्क साधून त्यांना आपल्या गोटात खेचल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. हे सर्व नगरसेवक सध्या राज्याबाहेर किंवा गोव्याच्या दिशेने रवाना झाल्याची चर्चा आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, पाच ठार
धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात होऊन पाच जण ठार झाल्याची घटना घडली आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लळिंग घाटात रविवारी पहाटे ही ...
विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठा पणाला :
ऐन विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर चंद्रपुरातून नगरसेवक 'नॉट रिचेबल' झाल्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. काँग्रेसचे प्रदेश नेतृत्व आणि वडेट्टीवार आता या नगरसेवकांशी पुन्हा संपर्क साधून त्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होतात की भाजप या निवडणुकीत बाजी मारते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
August 16, 2026 10:18 AM
मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष
महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
August 16, 2026 09:43 AM
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा
महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
August 16, 2026 08:47 AM
पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता
विदेशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
August 16, 2026 08:20 AM
नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू
महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
August 16, 2026 07:55 AM
मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम
देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
August 16, 2026 07:31 AM
नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला