Twisha Sharma Case : “समाज काय म्हणेल?”च्या भीतीने गमावला जीव? आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

नवी दिल्ली : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ट्विशा शर्मा (Twisha Sharma Case) मृत्यू प्रकरणावर आज म्हणजेच सोमवार २५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या ट्विशाचा मृतदेह भोपाळमधील सासरी संशयास्पद परिस्थितीत आढळल्यानंतर या प्रकरणाने राष्ट्रीय पातळीवर मोठं वादळ निर्माण केलं आहे. मानसिक छळ, कौटुंबिक दबाव, हुंडा आणि “समाज काय म्हणेल?” या भीतीमुळे एका तरुणीचा जीव गेला का, असा प्रश्न आता देशभरातून उपस्थित केला जात आहे.



लग्नानंतर सुरू झाला होता मानसिक त्रास?


ट्विशाच्या (Twisha Sharma Case) कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यानुसार, लग्नानंतर काही दिवसांतच तिला मानसिक आणि भावनिक त्रासाला सामोरं जावं लागत होतं. हनिमूनदरम्यान पतीने गैरवर्तन केल्याची माहिती ट्विशाने आपल्या भावाला दिली होती. मात्र संसार टिकवण्यासाठी तिने सर्व सहन करण्याचा प्रयत्न केला.



ट्विशा (Twisha Sharma Case) आणि तिच्या आईमधील कथित व्हॉट्सअ‍ॅप चॅट्समध्ये ती वारंवार “मी या नात्यात अडकले आहे” असे सांगताना दिसते. तिने माहेरी परतण्याची इच्छाही व्यक्त केली होती. मात्र कुटुंबीयांनी तिला “थोडं अजून अॅडजस्ट कर” असा सल्ला दिल्याचं समोर आलं आहे.



“आम्ही तिला वाचवू शकलो नाही” :


ट्विशाच्या (Twisha Sharma Case) वडिलांनी एका मुलाखतीत मोठी कबुली दिली. “आम्ही तिला त्या घरातून बाहेर काढायला हवं होतं. आम्ही उशीर केला,” असे त्यांनी म्हटले. या वक्तव्यानंतर समाजातील विवाह आणि प्रतिष्ठेच्या दबावावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.



सासरच्या कुटुंबाकडून गंभीर आरोप :


ट्विशाच्या (Twisha Sharma Case) मृत्यूनंतर तिच्या सासूकडून अनेक धक्कादायक दावे करण्यात आले. ट्विशावर मानसिक अस्थिरता, नातेसंबंधांबाबत संशय आणि घरगुती जबाबदाऱ्या न पाळल्याचे आरोप करण्यात आले. यामुळे प्रकरण आणखी तापलं आहे.



दरम्यान, मानसोपचारतज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे की, कोणत्याही व्यक्तीच्या मानसिक आरोग्याबाबत सार्वजनिकरित्या अंदाज बांधणे योग्य नाही. मृत व्यक्तीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करून प्रकरणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही सोशल मीडियावर होत आहे. (Twisha Sharma Case)



आज सर्वोच्च न्यायालयात काय होणार?


आज होणाऱ्या सुनावणीत तपास प्रक्रियेवर, पुराव्यांच्या हाताळणीवर आणि प्रकरणातील कथित मानसिक छळाच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणाचा तपास स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावा का, यावरही सुनावणीदरम्यान प्रश्न उपस्थित होऊ शकतात.



देशभरातून संताप :


ट्विशा शर्मा प्रकरणानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. “लग्न टिकवण्यासाठी मुलींनी सर्व सहन करावं का?” आणि “समाजाच्या भीतीपोटी किती ट्विशा बळी जाणार?” असे प्रश्न आता जोर धरत आहेत.


महिलांच्या सुरक्षिततेपासून मानसिक आरोग्यापर्यंत आणि विवाह संस्थेतील दबावापासून समाजाच्या दुटप्पी मानसिकतेपर्यंत अनेक मुद्दे या प्रकरणामुळे पुन्हा ऐरणीवर आले आहेत.




Comments
Add Comment

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला

Independence Day 2026 : तिरंगा, २१ तोफांची सलामी आणि ‘वंदे मातरम्’चा निनाद; लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ऐतिहासिक लाल

Independence Day 2026 : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google Doodleची खास कलाकृती; भारतीय वस्त्रकलेतून दिसली सांस्कृतिक विविधता

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google ने आपल्या होमपेजवर खास आणि रंगीबेरंगी Doodle सादर करून