मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, पाच ठार

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात होऊन पाच जण ठार झाल्याची घटना घडली आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लळिंग घाटात रविवारी पहाटे ही भीषण तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून १० ते १२ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रेतीने भरलेल्या डंपरने एका वाहनाला धडक दिली, याचवेळी मागून आलेली ट्रॅव्हल्स वाहन जोरदार धडकल्याने हा तिहेरी अपघात घडला. या अपघातानंतर घाट परिसरात एकच खळबळ उडाली असून महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.



मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लळिंग घाटातून भरधाव वेगाने जाणाऱ्या रेतीच्या डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे डंपर विरुद्ध बाजूला गेला आणि समोरून जाणाऱ्या एका वाहनावर धडकला. याचवेळी मालेगावकडून आलेले ट्रॅव्हल्स वाहन अपघातग्रस्त वाहनांवर जोरदार धडकले. ही धडक इतकी भीषण होती की वाहनांचा अक्षरशः चुराडा झालाय.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, महामार्ग पोलीस, तसेच टोल नाक्यावरील मदत पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठे बचावकार्य राबविण्यात आले. गंभीर जखमींना उपचारासाठी धुळे येथील शासकीय व खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृतांची आणि जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



दरम्यान, अपघातस्थळी मदतकार्य करत असताना लळिंग टोल नाक्यावरील काही कर्मचाऱ्यांचाही अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी लळिंग टोल नाक्यावर आंदोलन सुरू करत टोल वसुली बंद पाडली. “आम्हाला कोणतीही सुरक्षा नाही, विमा संरक्षण नाही, तरीही आम्ही जीव धोक्यात घालून अपघातग्रस्तांना मदत करतो.आमच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आवश्यक सुविधा व सुरक्षा पुरवायला हवी होती,” असा आरोप आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.


अपघातानंतर लळिंग घाट परिसरात काही काळ भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Comments
Add Comment

Hardik Pandya : हार्दिक पांड्यानं घेतला मोठा निर्णय, महिकासोबत घेतलं तिरुपतीच्या बालाजीचं दर्शन

तिरुपती : दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर असलेला क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या चर्चेत आहे.

Duleep Trophy 2026 Tilak Varma : तिलक वर्माच्या खांद्यावर मोठी जबाबदारी! दुलीप ट्रॉफीत दक्षिण विभागाचे कर्णधारपद; करुण नायरलाही संधी

मुंबई : भारताच्या टी-20 संघाचा उपकर्णधार तिलक वर्मा (Tilak Varma) याच्यावर बीसीसीआयने (BCCI) आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. 23

व्हॅली ऑफ फ्लॉवर्सच्या पलीकडे; भारतातील निसर्गरम्य आणि कमी-ज्ञात रानफुलांची अद्भुत ठिकाणे

प्रत्येक पावसाळ्यात उत्तराखंडमधील प्रसिद्ध 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' (फुलांची दरी) आपल्या विविध प्रकारच्या

Indonesia Ferry Boat Accident : इंडोनेशिया समुद्रात भीषण दुर्घटना! प्रवासी फेरी बोटला आग लागून 5 जणांचा मृत्यू, 41 बेपत्ता

जकार्ता : इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ रविवारी (2 ऑगस्ट) एक मोठी सागरी दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेल्या एका

FD New Rule : येत्या १ ऑक्टोबरपासून FD चे नवे नियम लागू! RBI चा मोठा निर्णय; गुंतवणूकदारांनी आधी हे जाणून घ्या

मुंबई : फिक्स्ड डिपॉझिट (FD) मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय

Delhi Earthquake : दिल्ली हादरली! पहाटे २.९ तीव्रतेचा भूकंप; अरुणाचल आणि आसाममध्येही जाणवले धक्के

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली रविवारी (२ ऑगस्ट) पहाटे सौम्य भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली. पहाटे ४.१४ वाजता