Nashik : TCS प्रकरणात मोठा ट्विस्ट! निदा खानच्या बाजूने थेट... महत्त्वाची माहिती समोर

Nashik : TCS प्रकरण रोज नवीन वळण घेत आहे. या प्रकरणात संशयित आरोपींचा जेवढा विरोध होत आहे तितकाच संशयितांना पाठिंबा देखील मिळत आहे. टीसीएस कंपनीत काम करणाऱ्या अविवाहित तरुणींवर बलात्कार आणि बळजबरीने धर्मांतर केल्याचा आरोप आहे. राज्यभर चर्चेत असलेल्या या प्रकरणातील संशयित आरोपींच्या समर्थनार्थ आता ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’ पुढे आली आहे. संशयित आरोपींच्या समर्थनार्थच कमिटी समोर आल्याने आश्यर्य व्यक्त केले आहे. (Nashik TCS case)


दरम्यान, TCS प्रकरणातील संशयित निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी अडकलेले ‘एमआयएम’चे (MIM) नगरसेवक मतीन पटेल (Mateen Patel) आज नाशिक पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मतीन पटेल यांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस मिळताच पटेल यांनी नरमाईची भूमिका घेतली असून, ते आज (सोमवारी) नाशिक शहर पोलिसांना शरण येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.



संशयित आरोपींच्या बाजूने ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’ 


इस्लाम पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार आसिफ शेख (Asif Shaikh) यांनी आरोपींच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणावर मोठे वक्तव्य केले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानसह इतर ६ आरोपींच्या बाजूने ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’ उभी राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. ‘भोंदू अशोक खरात प्रकरण’ दाबण्यासाठीच हे प्रकरण जाणीवपूर्वक पुढे आणण्यात आले असून, टीसीएस (TCS) प्रकरणात कोणतेही तथ्य नसल्याचा दावा शेख यांनी केला आहे. निदा खान यांच्यावर झालेले आरोप हे खोटे असून, न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या वेळी आपण स्वतः हजर राहणार असल्याचेही शेख यांनी स्पष्ट केले.


व्हॉट्सॲप चॅटमधून धक्कादायक खुलासे


दरम्यान, पोलीस तपासात संशयित निदा एजाज खान हिने तिच्या एका नातेवाईकासोबत केलेल्या व्हॉट्सॲप चॅटिंगमधून अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धक्कादायक खुलासे झाले आहेत. संशयितांनी रचलेल्या कटानुसार पीडित तरुणीचे वर्तन सुरू झाल्यावर, तिचे नाव बदलून ‘हानिया’ असे ठेवण्यात आल्याचे या चॅटिंगवरून निष्पन्न झाले आहे. या पुराव्यांमुळे पोलिसांच्या तपासाला मोठी गती मिळाली आहे. मात्र संशयितांच्या बाजूने कमिटी उभी राहिल्याने आता प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.



नगरसेवक मतीन पटेल पोलिसांना शरण येणार?


याच गुन्ह्यात निदा खान फरार असताना तिला आश्रय दिल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना सहसंशयित करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी नाशिक गुन्हे शाखेचे पथक पटेल यांच्या शोधार्थ संभाजीनगरमध्ये गेले होते, मात्र ते हाती लागले नव्हते. आता या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पटेल यांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस मिळताच पटेल यांनी नरमाईची भूमिका घेतली असून, ते आज (सोमवारी) नाशिक शहर पोलिसांना शरण येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. बजावलेल्या नोटिशीप्रमाणे मतीन पटेल आज हजर राहणार का, याकडे संपूर्ण नाशिकचे लक्ष लागून आहे.

Comments
Add Comment

Special Intensive Revision : विशेष सखोल पुनरिक्षण १०० टक्के पूर्ण करण्यात चिपळूण राज्यात प्रथम

रत्नागिरी : मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे काम १०० टक्के पूर्ण करणारा रत्नागिरी जिल्ह्यातील ‘२६५ –

Revenue Department : नोंदणी व मुद्रांक विभागात 160 अधिकाऱ्यांना पदोन्नती; महसूल विभागाचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा

Bank of Baroda : 'बँक ऑफ बडोदा'च्या एक टीबी डेटाची चोरी; ग्राहकांची माहिती, वैयक्तिक तपशील आणि कागदपत्रे डार्क वेबवर उपलब्ध

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील देशातील एक अग्रेसर आणि महत्त्वाची बँक असलेल्या 'बँक ऑफ बडोदा'चा (Bank of Baroda)तब्बल १

Supreme Court : शांततापूर्ण निदर्शने हा संविधानाने दिलेला अधिकार; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

नवी दिल्ली : नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून देशभर तीव्र आंदोलन पुकारण्यात आले होते. 'कॉकरोच

Devendra Fadnavis : गारगाई धरण प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईसाठी प्रकल्प ठरणार महत्वपूर्ण ठरणार मुंबई, दि. २७ : पालघर जिल्ह्यातील देवळी परिसरात होत असलेल्या गारगाई

Ganpati Special Train: गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेची मोठी घोषणा; 246 विशेष गाड्या धावणार, मुंबई-कोकण प्रवास होणार सुलभ

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविक आणि प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिला