Drsihyam 3 box office collection : दृश्यम 3 चा बॉक्स ऑफिसवर धूमधडाका; अवघ्या 48 तासांत 6 सिनेमांना मागे टाकत केली रेकॉर्डब्रेक कमाई

Mumbai : Drishyam 3 ने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण केले आहे. (मोहनलाला) Mohanlal यांच्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या दोन दिवसांत सिनेमाने कमाईचे अनेक विक्रम मोडले आहेत. सस्पेन्स, थ्रिल आणि दमदार स्टोरी लाईनमुळे प्रेक्षकांनी चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. दिग्दर्शक जीतहू जोसेफ (Jeethu Joseph) यांच्या या चित्रपटाची रिलीज होण्यापूर्वीच जोरदार चर्चा रंगली होती. अॅडव्हान्स बुकिंगमध्येही सिनेमाने दमदार प्रतिसाद मिळवला होता.


दोन दिवसांत किती कमाई?


पहिल्याच दिवशी दृश्यम 3 ने 15.85 कोटी रुपयांची शानदार ओपनिंग केली आहे. दुसऱ्या दिवशी कमाईत किंचित घट झाली असली, तरी चित्रपटाने 11.05 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले. रिपोर्टनुसार, दोन दिवसांत चित्रपटाचे भारतातील कलेक्शन 26.90 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, तर ग्रॉस कलेक्शन 31.18 कोटी रुपये झाले आहे.



विदेशातही मोहनलालचा दबदबा


भारतात कमाईत थोडी घसरण झाली असली, तरी परदेशात मात्र सिनेमाचा जलवा कायम आहे. दुसऱ्याच दिवशी चित्रपटाने विदेशात जवळपास 20 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे चित्रपटाची एकूण ओव्हरसीज कमाई 45 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. याचबरोबर दृश्यम 3 चे वर्ल्डवाइड कलेक्शन अवघ्या दोन दिवसांत 76 कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. त्यामुळे या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.


6 सिनेमांना टाकले मागे

दृश्यम ३ ने अवघ्या दोन दिवसात सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या गटात प्रवेश केला आहे. सध्या २०२६ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत वाझा २, आडू २ आणि पॅट्रियट या सिनेमांचा समावेश आहे. याच्यांनतर आता दृश्यम ३ ने स्थान मिळवले आहे.



२०२६ मध्ये सर्वाधिक कमाई करणारे टॉप १० सिनेमा


वाझा 2: 238.46 कोटी
आडू 3: 121.31 कोटी
पॅट्रियट: 80.51 कोटी
दृश्यम 3: 76 - 78 कोटी (2 दिवस )
अथिराडी: 54.69 कोटी
भरतनाट्यम 2 मोहिनीअट्टम: 40.63 कोटी
चथा पाचा: 33.47 कोटी
प्रकम्बनम: 20.86 कोटी
पल्लीचट्टंबी: 14.49 कोटी
आशाकाल आयराम: 12.71 कोटी


सोशल मीडियावरही तुफान चर्चा


सोशल मीडियावरही दृश्यम 3 ची जोरदार चर्चा सुरू आहे. मोहनलालच्या ॲक्टिंगचे विशेष कौतुक होत आहे. अनेकांनी या चित्रपटाला दृश्यम फ्रँचायझीतील सर्वात दमदार भाग असल्याचे म्हटले आहे. आता येत्या काही दिवसांत दृश्यम 3 आणखी कोणते मोठे रेकॉर्ड मोडतो, याकडे संपूर्ण चित्रपटविश्वाचे लक्ष्य लागले आहे.

Comments
Add Comment

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के