Deool Band 2 : थिएटरमध्ये स्वामी समर्थांचा जयजयकार : ‘देऊळ बंद 2’ची विक्रमी कमाई

थिएटरमध्ये स्वामी समर्थांचा जयजयकार सुरू असून 'देऊळ बंद 2' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रभावी प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत या चित्रपटाने किती कोटी रुपयांची कमाई केली, ते जाणून घेऊयात.


">२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'देऊळ बंद' या चित्रपटाचा दुसरा भाग २१ मे २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' नंतर आता प्रवीण तरडे यांचा हा चित्रपट दमदार कामगिरी करतोय. विशेष म्हणजे पहाटेच्या शोसाठीही प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली आहे. अनेक थिएटर्समध्ये या चित्रपटाचे शोज हाऊसफुल्ल झाल्याचे पाहायला मिळत आहे.



'देऊळ बंद 2'ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी २.४५ कोटी रुपयांची पेटी जमवली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी २.५५ कोटी रुपयांची कमाई झाली होती. 'देऊळ बंद 2'च्या वीकेंडच्या कमाईत दुप्पट वाढ झाल्याचं पहायला मिळालं. पहिल्या शानिवारच्या कमाईचा आकडा ४.८५ कोटी रुपयांवर पोहोचला.



'देऊळ बंद 2' या चित्रपटाने आतापर्यंत भारतात ९.८५ कोटी रुपयांचं नेट कलेक्शन आणि ११.६२ कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, जळगाव, विदर्भ आणि मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरत आहे.


२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'देऊळ बंद' या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी याने राघव शास्त्रीची मुख्य भूमिका साकारली होती. आता 'देऊळ बंद 2'मध्ये प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडे हिने एका शेतकरी महिलेची मुख्य भूमिका साकारली आहे. तर अभिनेते मोहन जोशी हे पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत ज्याना प्रेक्षकणी मनभरून पसंत केले आहे.



या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचे आहे. त्यांच्या वास्तववादी मांडणीमुळे आणि प्रभावी लेखनकौशल्यमुळे चित्रपट अधिक प्रभावी ठरला आहे. चित्रपट प्रदर्शित होताच मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे ‘देऊळ बंद 2 – आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील यंदाचा सर्वाधिक चर्चेत असलेला आणि संभाव्य ब्लॉकबस्टर चित्रपट ठरणार असल्याची चर्चा चित्रपट वर्तुळात सुरू झाली आहे.

Tags
marathimarathi moviemarathi blockbuster moviesbox office collectionDeool band 2
Comments
Add Comment

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के