Actor Gashmeer Mahajani : ‘देऊळ बंद’फेम गश्मीर महाजनी लवकरच नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार का ?

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी सध्या आपल्या नव्या सोशल मीडिया पोस्टमुळे प्रचंड चर्चेत आला आहे. गश्मीरने नुकतेच त्याचे काही स्टायलिश आणि डॅशिंग फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यांना चाहत्यानी मोठ्या प्रमाणात पसंत केले आहे . या फोटोंमध्ये गश्मीर डोंगराळ भागातील एका रस्त्यावर बॅकपॅक आणि ट्रॅव्हल लूकमध्ये बसलेला दिसून येत आहे. हे फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये ‘स्वामींच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा नव्या पर्वाची सुरुवात …. लवकरच’, असे लिहिले आहे.







त्याच्या या सूचक कॅप्शनमुळे गश्मीर महाजनी लवकरच एका मोठ्या आणि नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असल्याचे स्पष्ट होत आहे. गश्मीरने यापूर्वी सुपरहिट ठरलेल्या ‘देऊळ बंद’ या मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. ‘देऊळ बंद’ चित्रपटातील राघव या त्याच्या शास्त्रज्ञाच्या भूमिका आणि अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम आणि दाद दिली होती.आता गश्मीरच्या या नव्या पोस्टमुळे तो कुठल्या नवीन भूमिकेत येणार आहे याची चाहत्याना उत्सुकता लागली आहे.

Comments
Add Comment

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के