पुणे : पुण्यातील (Pune) प्रसिद्ध सिंहगड (Sinhagad) किल्ला परिसरात एक भीषण अपघात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सिंहगड घाटातील ११ हजार पॉईंट परिसरात दुचाकी (Two-Wheeler) थेट खोल दरीत कोसळल्याने दोन पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात पूजा चव्हाण आणि सौरव पासलकर हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सिंहगड किल्ल्यावरून घाटमार्गाने खाली येत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात (Accident) घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
डोंबिवली : प्रेमविवाहाला (Love Marriage) कुटुंबियांचा विरोध, घरच्यांच्या नाराजीमुळे दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न करणं, अशा घटना अनेकदा समोर येतात. मात्र, ...
चालकाचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि...
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा चव्हाण आणि सौरव पासलकर हे दोघे सिंहगड किल्ल्यावरून दुचाकीवरून खाली येत होते. घाटातील वळणदार रस्त्यावरून प्रवास करत असताना अचानक चालकाचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर दुचाकी थेट रस्त्यालगतच्या खोल दरीत जाऊन कोसळली. हा अपघात इतका गंभीर होता की दुचाकी दरीत कोसळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
डोंबिवली : नवी मुंबई (Navi Mumbai) आणि ठाणे (Thane) पोलिसांनी संयुक्तपणे राबवलेल्या ‘ऑपरेशन गरुड ३’ अंतर्गत शनिवारी पहाटे डोंबिवलीतील पलावा सिटी आणि खोणी गाव ...
घटनेची माहिती मिळताच वनविभाग, वन समितीचे कर्मचारी, स्थानिक नागरिक, पर्यटक तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरीचा परिसर अत्यंत कठीण आणि धोकादायक असल्याने बचावकार्य राबवताना पथकांना मोठी कसरत करावी लागली.
जखमींना दरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश
अपघातानंतर सुरू करण्यात आलेल्या बचाव मोहिमेत (Rescue Operation) वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन पथक, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी संयुक्तपणे मदतकार्य केले. अथक प्रयत्नांनंतर दोन्ही जखमींना दरीतून सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुंबई : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पुण्यातील शेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनिषा हवालदार यांना अटक केली ...
या अपघातात पूजा चव्हाण हिच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्या पायाच्या इतर भागांनाही फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सौरव पासलकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे सिंहगड घाट परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने वेळीच मदतकार्य सुरू झाल्याने दोघांचे प्राण वाचवण्यात यश आले.






