श्रीनगर : उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत दहशतवाद्यांच्या संशयित ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात स्फोटक दारुगोळा जप्त केला आहे. या कारवाईमुळे संभाव्य दहशतवादी कट उधळण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले असून परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई : भारतातील किरकोळ विक्री क्षेत्रात डीमार्टने (DMart) गेल्या काही वर्षांत आपले एक वेगळे आणि भक्कम स्थान निर्माण केले आहे. कमी किंमतीत दर्जेदार वस्तू ...
या मोहिमेत १४ राउंड ओजी-७व्ही रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड (RPG) आणि ९ राउंड पीजी-७पी रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड जप्त करण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य सापडल्याने सुरक्षा यंत्रणांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. प्राथमिक तपासानुसार, हा साठा सुरक्षा दलांवर मोठा हल्ला घडवून आणण्यासाठी वापरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेत व्हाईट हाऊस बाहेर गेट जवळ गोळीबार झाला. एका व्यक्तीने त्याच्याकडे असलेल्या बॅगेतून शस्त्र काढून अंदाधुंद गोळीबार सुरू ...
गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाया अधिक तीव्र करण्यात आल्या आहेत. विशेषतः उत्तर काश्मीरमधील सीमावर्ती भागांत दहशतवादी घुसखोरी रोखण्यासाठी आणि त्यांच्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी सुरक्षा दलांकडून सातत्याने शोधमोहीम राबवण्यात येत आहे. बारामुल्लामधील ही कारवाई त्याच मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग मानली जात आहे.






