Itel A100 Pro : आयटेल ए१०० प्रो मिलिटरी ग्रेड टफनेससह ८९९९ रुपयांमध्ये लाँच

मुंबई : आयटेल या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने ए१०० प्रो स्मार्टफोन लाँच केला आहे. आपल्या उत्कृष्ट डिझाइनमुळे सर्वत्र चर्चेत असलेला हा स्मार्टफोन टिकाऊपणा, स्टाईल आणि परवडणाऱ्या किमतीचा एक उत्तम संगम म्हणून समोर आला आहे. ए१०० प्रो स्मार्टफोन मिलिटरी ग्रेड प्रमाणपत्राने (एमआयएल-एसटीडी-८१०एच) सुसज्ज आहे, जो वापरकर्त्यांना अद्वितीय टिकाऊपणा आणि मानसिक शांतता प्रदान करतो. अल्ट्रालिंकने सुसज्ज असलेला हा स्‍मार्टफोन नेटवर्क कनेक्टिव्हिटी नसलेल्या ठिकाणीही कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. ए१०० प्रो स्मार्टफोन ३+५* जीबी रॅम आणि ६४ जीबी रॉमसह उपलब्ध आहे. १५ कोटींपेक्षा जास्त ग्राहकांचा मोठा ग्राहकवर्ग असलेल्या या कंपनीची १.३ लाखांपेक्षा जास्त रिटेल आउटलेट्स आणि १००० पेक्षा जास्त सर्व्हिस सेंटर्समध्ये रिटेल उपस्थिती आहे. जागतिक स्तरावर मेमरीच्या किमती वाढल्या असूनही हा स्‍मार्टफोन फक्त ८९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे १० हजारांच्या आत इतकी प्रीमियम डिझाइन असलेला स्मार्टफोन देणारा हा एकमेव ब्रँड ठरला आहे. आयटेल १०० दिवसांच्या आत मोफत स्क्रीन बदलून (स्क्रीन रिप्लेसमेंट) देण्याची सुविधा देखील प्रदान करते, ज्‍यामधून भारतातील फक्त आयटेलद्वारे दिली जाणारी अद्वितीय उत्पादन गुणवत्ता आणि विश्वासार्हतेची खात्री मिळते.



या लाँचबाबत मत व्‍यक्त करत आयटेल इंडियाचे सीईओ अरिजित तालापात्रा म्हणाले, "आयटेल नेहमी लाखो भारतीयांसाठी टिकाऊ, विश्वासार्ह आणि परवडणारी उत्पादने तयार करण्यात अग्रेसर राहिली आहे. ए१०० प्रो चे हे नवीन लाँच त्याच वारशाचा पुढचा भाग आहे. मजबूत मिलिटरी ग्रेड रचना असलेल्‍या या स्‍मार्टफोनची आकर्षक डिझाइन आणि रंग हे भारतातील वैविध्‍यपूर्ण सांस्कृतिक वारशाचा सन्मान करणारे आहेत. अलीकडील सीएमआर ड्युरॅबिलिटी इंडेक्स आमच्या वापरकर्त्यांना आधीच माहीत असलेल्या गोष्टीला पुन्हा दुजोरा देतो की, आयटेल हा १० हजारांच्या आतील सर्वात टिकाऊ आणि विश्वासार्ह मोबाइल ब्रँड आहे."


भारतातील डिवाईस बाजारपेठेतील टिकाऊपणा, विश्वासार्हता आणि परवडणाऱ्या दरांच्या वाढत्या भूमिकेवरील नवीन सायबर मीडिया रिसर्च (सीएमआर) अहवालाने आयटेलची सर्वच क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी दर्शवली आहे. यामध्ये आयटेलने फीचर फोन्समध्ये ०.६५ आणि स्मार्टफोनमध्ये ०.८६ चे प्रभावी गुण मिळवले आहेत, जे या विभागातील सर्वाधिक आहेत. याव्यतिरिक्त, ८५ टक्के ग्राहकांना वाटते की त्यांना पैशांचे पूर्ण मूल्य (व्हॅल्यू फॉर मनी) मिळते, ८१ टक्के ग्राहक आयटेलला मजबूती आणि टिकाऊपणाशी जोडतात, ७९ टक्के ग्राहक याच्या डिझाईनचे कौतुक करतात आणि ७४ टक्के ग्राहक याला एक विश्वासार्ह व खात्रीशीर ब्रँड मानतात.



आयटेल ए१०० प्रो मध्‍ये आकर्षक ६.६ इंच ९० हर्ट्झ एचडी+ डिस्प्ले आहे, ज्याला सर्वोत्तम डीटीएस-समर्थित साउंड तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे, जे आकर्षक रंगसंती, स्पष्ट अचूकता आणि अल्ट्रा-स्मूथ व्हिज्युअल्ससह संवेदनांना मंत्रमुग्ध करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. यामध्ये असलेले सर्वोत्तम डायनॅमिक बार वापरकर्त्यांना बॅटरीची स्थिती, कॉल्स, नोटिफिकेशन्स आणि इतर गोष्टींशी कोणत्याही व्यत्ययाशिवाय सहजपणे जोडून ठेवते. फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांना ८ मेगापिक्सल रिअर कॅमेरा नक्कीच आवडेल, जो प्रगत इमेज प्रोसेसिंगसह सुधारित केला गेला आहे, ज्यामुळे स्पष्ट आणि आकर्षक फोटोज मिळतात. ए१०० प्रो मध्ये आयआर ब्लास्टर देखील आहे, ज्यामुळे टीव्ही, एअर कंडिशनर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे रिमोटद्वारे नियंत्रित करणे सोपे होते.


ऑक्टा-कोर युनिसॉक टी७१०० प्रोसेसर आणि अँड्रॉइड १५ गो द्वारे समर्थित ए१०० प्रो विनासायास मल्टीटास्किंग, स्‍मूथ गेमिंग आणि सहज व्हिडिओ कॉल्सची खात्री देतो. सुरक्षा आणि सुलभतेसाठी, ए१०० प्रो फेस अनलॉक आणि साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज आहे, जे संरक्षण आणि सुविधा दोन्ही प्रदान करते. विशाल ५००० एमएएच बॅटरी आणि १० वॅट चार्जरसह हा डिवाईस दिवसभर कार्यरत राहण्‍याची खात्री मिळते. हा स्मार्टफोन कॉमेट ऑरेंज, क्लाउड व्हाईट आणि ब्लॅक या आयकॉनिक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Comments
Add Comment

Nashik : आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवरून वाद, मनपा अधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा

Nashik : नाशिकच्या दिंडोरी जकात नाका परिसरात आदिवासी कुटुंबाच्या ताब्यातील जमिनीवरील शेड हटवून जागा बळकावण्याचा

Raksha Bandhan Gifts 2026 : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला चुकूनही देऊ नका ही गिफ्ट्स; मानली जातात अशुभ!

मुंबई : रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, तर

TVJA Dahi Handi : TVJA गोविंदांचा थरार; पत्रकारांच्या एकतेचे दर्शन घडवत दहीहंडी उत्साहात

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशन (TVJA)च्या सदस्यांनी वरळी येथील NSCI डोममध्ये

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत

Health Tips : रोजच्या आयुष्यातील 'या' १० सवयी आपल्या आरोग्यासाठी ठरू शकतात घातक; आजच करा बदल

मुंबई : आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही सवयी अगदी सामान्य वाटतात. मात्र, त्यांचा सतत आणि दीर्घकाळ परिणाम शरीरावर