TVJA Dahi Handi : TVJA गोविंदांचा थरार; पत्रकारांच्या एकतेचे दर्शन घडवत दहीहंडी उत्साहात

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशन (TVJA)च्या सदस्यांनी वरळी येथील NSCI डोममध्ये मानवी मनोरा उभारत उत्साह, साहस आणि पत्रकारांच्या एकतेचे दर्शन घडविले. (TVJA Dahi Handi)


दहीहंडी हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला पारंपरिक आणि साहसी खेळ आहे. काळानुसार या उत्सवाचे स्वरूप बदलत असले, तरी प्रो-गोविंदा स्पर्धांमुळे या क्रीडाप्रकाराला मोठे व्यासपीठ मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर TVJAच्या सदस्यांनी कोणत्याही स्पर्धेचा भाग न बनता केवळ आनंद, मैत्री आणि आपुलकी जपण्याच्या उद्देशाने गोविंदा पथकाची उभारणी केली. (TVJA Dahi Handi)



मानवी मनोरा उभारण्यासाठी सदस्यांनी गेल्या काही दिवसांपासून सराव आणि प्रशिक्षण घेतले. त्यानंतर वरळीतील NSCI डोम येथे आयोजित दहीहंडी उत्सवात सहभागी होत त्यांनी थर रचत गोविंदाचा थरार अनुभवला. यावेळी उपस्थितांनी गोविंदांच्या साहसी खेळाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांचा उत्साह वाढविला. (TVJA Dahi Handi)



दैनंदिन बातम्यांचे कव्हरेज आणि पत्रकारितेच्या धावपळीतून काही काळ बाजूला होत TVJAच्या सदस्यांनी पारंपरिक दहीहंडी उत्सवाचा मनमुराद आनंद घेतला. या उपक्रमामुळे सदस्यांमधील मैत्री, आपुलकी आणि संघभावना अधिक दृढ झाली. ‘थरांच्या उंचीपेक्षा TVJAच्या एकतेची उंची मोठी’ हा संदेश देत पार पडलेल्या या उपक्रमाने दहीहंडी उत्सवाला सामाजिक आणि संघटनात्मक एकतेची वेगळीच किनार दिली. (TVJA Dahi Handi)


Comments
Add Comment

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या