Bollywood News : आलिया, शिल्पा, माधुरीला मागे टाकत 'ही' विदेशी अभिनेत्री ठरली युट्यूबवर नंबर १ !

सध्याच्या डिजिटल युगात बॉलिवूड सेलिब्रिटी केवळ पडद्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. इन्स्टाग्रामवर सक्रिय असणारे हे स्टार्स आता लाँग व्हिडिओ आणि व्लॉगिंगसाठी यूट्यूबचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, यूट्यूबवर सर्वाधिक सब्सक्रायबर्स असणाऱ्या टॉप ७ सेलिब्रिटींची यादी समोर आली आहे. यामध्ये एका विदेशी अभिनेत्रीने अव्वल स्थान पटकावले आहे. त्यात तिने आलिया पासून अगदी माधुरी दीक्षितपर्यंत सर्वांनाच मागे टाकले आहे.



बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही हिने आलिया भट्ट, शिल्पा शेट्टी आणि माधुरी दीक्षित यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकत, यूट्यूबवर पहिले स्थान मिळवले आहे. नोराच्या यूट्यूब चॅनेलवर ४५ लाख म्हणजेच ४.५ मिलियनहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत.

"> बॉलिवूडमध्ये सर्वाधिक सब्सक्रायबर्स मिळालेली ती पहिली अभिनेत्री ठरली आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर योगा क्वीन शिल्पा शेट्टी कुंद्रा आहे. तिचे ३८ लाख सब्सक्रायबर्स आहेत. तर तरुणांची लाडकी अभिनेत्री आलिया भट्ट २६ लाख सब्सक्रायबर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत चौथ्या क्रमांकावर क्रिती सेनॉन आहे. तिचे जवळपास १३.३ लाख सब्सक्राइबर्स आहेत. तर पाचव्या क्रमांकावर धकधक गर्ल म्हणून ओळख असलेली माधुरी दीक्षित आहेत. तिचे जवळपास १३.१ लाख सब्सक्रायबर्स आहेत.



विशेष म्हणजे, या संपूर्ण यादीत कार्तिक आर्यन हा एकमेव पुरुष अभिनेता आहे. त्याचे ८.३ लाख सब्सक्रायबर्स आहे. तो या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ८.२६ लाख सब्सक्रायबर्ससह सातव्या स्थानावर आहे. सेलिब्रेटींचा नवा अड्डा म्हणून यूट्यूबकडे पाहिले जाते. बॉलिवूड स्टार्सच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. आता हे स्टार्स स्वतः व्लॉग आणि पॉडकास्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या थेट संपर्कात येत आहेत. यूट्यूबवर सध्या बॉलिवूडच्या अनेक मोठ्या स्टार्सच्या बाता आहे. पण या मध्ये कॅनेडियन वंशाची अभिनेत्री नोरा फतेहीने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. तिने तिच्या यूट्यूब सब्सक्रायबर्सच्या माध्यमातून बॉलिवूडच्या दिग्गजांना मागे टाकले आहे हे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

Tags
Exclusive newsbollywoodBollywood newsYoutube subscriberssubscribers
Comments
Add Comment

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के