मुंबई : गेल्या आठवडाभरापासून सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत असलेल्या अभिजीत दिपके यांच्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला (Cockroach Janata Party) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. एक्स (ट्विटर) आणि इन्स्टाग्राम अकाऊंटनंतर आता पक्षाचे अधिकृत संकेतस्थळही बंद करण्यात आले आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांना पक्षात सहभागी होण्यासाठी नोंदणी करता येत होती. मात्र, अचानक वेबसाईट बंद झाल्याने समर्थकांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्नाटक : कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात काल म्हणजेच शुक्रवार २२ मे रोजी मध्यरात्री भीषण रस्ता अपघात झाला. चित्तापूर तालुक्यातील लाडलापूर गावाजवळ ...
या घडामोडींनंतर पक्षाचे (Cockroach Janata Party) संस्थापक अभिजीत दिपके काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियावरील अकाऊंट्स बंद झाल्यानंतर काही समर्थकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच, कोणतीही निदर्शने झाल्यास त्याच्याशी आपला संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
The government has taken down our iconic website - https://t.co/l6i6Ry8h5S. 10 Lakh cockroaches had signed up on our website has members. 6 Lakh cockroaches had signed a petition to demand the resignation of Dharmendra Pradhan. Why is the government so scared of cockroaches?…
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) May 23, 2026
रत्नागिरी, रायगड आणि पालघरच्या किनाऱ्यावर उभे राहणार विशाल 'शिप बिल्डिंग' प्रकल्प मुंबई (सुहास शेलार) : "महाराष्ट्राला लाभलेल्या ८७७ किलोमीटरच्या ...
‘कॉक्रोच जनता पार्टी’भोवती (Cockroach Janata Party) निर्माण झालेलं गूढ, सोशल मीडियावरील झपाट्याने वाढलेला प्रतिसाद आणि त्यानंतर झालेल्या सलग कारवायांमुळे हा विषय आता राज्यासह देशभरात चर्चेचा बनला आहे.





