त्र्यंबकेश्वर : अडीच हजार रुपये द्या अन मंदिरात थेट 'विराम दर्शन' घ्या ; अजब प्रस्तावाने भाविक संभ्रमात

नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरातील (Trimbakeshwar Temple)  दर्शनासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा आणि त्याचा गैरफायदा घेत होणारा 'दर्शनाचा काळा बाजार' रोखण्यासाठी देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने नवीनच पर्याय काढला आहे. पर्याय नवीन आहे आणि अजब देखील आहे त्यामुळे नवाकोरा पर्याय वादाच्या भोवऱ्यात येण्याची शक्यता आहे. (Pay 2500 rupees and have 'Viram Darshan' directly at the Trimbakeshwar temple)



अडीच हजार द्या , मंदिरात ब्रेक दर्शन' घ्या


'ब्रेक दर्शन' अर्थात विराम दर्शन हा नवा पर्याय देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने प्रस्तावित केला आहे. या 'विराम दर्शना' साठी अडीच हजार रुपये मोजावे लागणार आहेत. पुढील काही दिवसांत ही व्यवस्था प्रत्यक्षात अमलात येण्याची शक्यता असून, अधिकृत तिकीट पद्धतीमुळे दलालांमार्फत होणारी आर्थिक लूट थांबेल, असा विश्वास ट्रस्टने व्यक्त केला आहे. मात्र, अडीच हजार रुपये एवढी मोठी किंमत दर्शनासाठी ठेवल्याने पुन्हा वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.


त्र्यंबकेश्वर मंदिरात पहाटे ५ ते रात्री ९ या वेळेत दर्शन सुरू असते. सध्या पूर्व दरवाजाने मोफत रांग आणि उत्तर दरवाजाने २०० रुपयांच्या पेड पासची रांग अशा दोन व्यवस्था आहेत. या दोन्ही रांगा नंदी मंदिराजवळ एकत्र होतात. २०० रुपयांच्या रांगेतील भाविकांना सभामंडपाच्या उत्तर बाजूने पुढे सोडले जात असल्याने त्यांना तुलनेने जलद दर्शन मिळते. नव्या ' विराम दर्शन ' व्यवस्थेनुसार दर्शनाच्या वेळेत प्रत्येक तासाला पाच मिनिटांचा ब्रेक देण्यात येणार आहे.



भाविकांकडून लूट म्हणून नवा पर्याय


ट्रस्टच्या मते, सध्या बाहेरील दलाल २०० रुपयांचे तिकीट काढून भाविकांकडून हजारो रुपये उकळतात आणि त्यांना सामान्य तिकीट रांगेतच सोडतात किंवा ओळखीच्या जोरावर जाळीच्या गेटमधून प्रवेश मिळवून देतात. अधिकृत २५०० रुपयांची पावती सुरू झाल्यास मध्यस्थ दलालांकडून होणारी फसवणूक कमी होईल, असा दावा विश्वस्त मंडळाने केला आहे.


मात्र भाविकांची लूट थांबवावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून नवा प्रस्ताव विश्वस्त मंडळाने आणला असला तरी २५०० रुपयांची पावती घेणे सर्वसामान्यांना परवडणार आहे का ? लूट थांबण्यासाठी अधिकृत २५०० रुपयांची पावती तरी योग्य कशी आहे ? याबाबत भाविकांमध्ये मात्र संभ्रम दिसून येतो आहे.

Comments
Add Comment

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक

Monsoon Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन संपले, दोन्ही सभागृहांची १२ विधेयकांना मंजुरी

नवी दिल्ली : सोमवार २० जुलै २०२६ रोजी सुरू झालेले संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ रोजी अनिश्चित

Rohan Jadhav : १० कोटींचा घोटाळा, ५४३६ बँक खाती, थेट हाँगकाँगपर्यंत कनेक्शन, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : काही महिन्यांपूर्वी एका ज्येष्ठ नागरिक व्यक्तीची १० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याची घटना समोर आली.

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ला निंदनीय; हल्लेखोरांना सोडणार नाही – एकनाथ शिंदे

मुंबई : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये