नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरातील (Trimbakeshwar Temple) दर्शनासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा आणि त्याचा गैरफायदा घेत होणारा 'दर्शनाचा काळा बाजार' रोखण्यासाठी देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने नवीनच पर्याय काढला आहे. पर्याय नवीन आहे आणि अजब देखील आहे त्यामुळे नवाकोरा पर्याय वादाच्या भोवऱ्यात येण्याची शक्यता आहे. (Pay 2500 rupees and have 'Viram Darshan' directly at the Trimbakeshwar temple)
अहिल्यानगर : मुंबईत गेल्या महिन्यात एकाच कुटुंबात चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. विशेष म्हणजे, कलिंगड आणि बिर्याणी ...
अडीच हजार द्या , मंदिरात ब्रेक दर्शन' घ्या
'ब्रेक दर्शन' अर्थात विराम दर्शन हा नवा पर्याय देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने प्रस्तावित केला आहे. या 'विराम दर्शना' साठी अडीच हजार रुपये मोजावे लागणार आहेत. पुढील काही दिवसांत ही व्यवस्था प्रत्यक्षात अमलात येण्याची शक्यता असून, अधिकृत तिकीट पद्धतीमुळे दलालांमार्फत होणारी आर्थिक लूट थांबेल, असा विश्वास ट्रस्टने व्यक्त केला आहे. मात्र, अडीच हजार रुपये एवढी मोठी किंमत दर्शनासाठी ठेवल्याने पुन्हा वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.
त्र्यंबकेश्वर मंदिरात पहाटे ५ ते रात्री ९ या वेळेत दर्शन सुरू असते. सध्या पूर्व दरवाजाने मोफत रांग आणि उत्तर दरवाजाने २०० रुपयांच्या पेड पासची रांग अशा दोन व्यवस्था आहेत. या दोन्ही रांगा नंदी मंदिराजवळ एकत्र होतात. २०० रुपयांच्या रांगेतील भाविकांना सभामंडपाच्या उत्तर बाजूने पुढे सोडले जात असल्याने त्यांना तुलनेने जलद दर्शन मिळते. नव्या ' विराम दर्शन ' व्यवस्थेनुसार दर्शनाच्या वेळेत प्रत्येक तासाला पाच मिनिटांचा ब्रेक देण्यात येणार आहे.
Nashik : नाशिक शहराला नेमकी कोणाची नजर लागली हा प्रश्न आता नाशिकरांना पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या गंभीर प्रकरणात नाशिक शहर राज्यात ...
भाविकांकडून लूट म्हणून नवा पर्याय
ट्रस्टच्या मते, सध्या बाहेरील दलाल २०० रुपयांचे तिकीट काढून भाविकांकडून हजारो रुपये उकळतात आणि त्यांना सामान्य तिकीट रांगेतच सोडतात किंवा ओळखीच्या जोरावर जाळीच्या गेटमधून प्रवेश मिळवून देतात. अधिकृत २५०० रुपयांची पावती सुरू झाल्यास मध्यस्थ दलालांकडून होणारी फसवणूक कमी होईल, असा दावा विश्वस्त मंडळाने केला आहे.
मात्र भाविकांची लूट थांबवावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून नवा प्रस्ताव विश्वस्त मंडळाने आणला असला तरी २५०० रुपयांची पावती घेणे सर्वसामान्यांना परवडणार आहे का ? लूट थांबण्यासाठी अधिकृत २५०० रुपयांची पावती तरी योग्य कशी आहे ? याबाबत भाविकांमध्ये मात्र संभ्रम दिसून येतो आहे.






