Gadchiroli : गडचिरोलीत माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त करण्याच्या दिशेने पोलिसांनी आणखी एक मोठे यश संपादन केले आहे. ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांनी दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांनी बिनागुंडा जंगल परिसरात धडक कारवाई करत माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला आहे. तसेच घातपाती कारवायांसाठी जमिनीखाली लपवून ठेवलेले मोठ्या प्रमाणावरील शस्त्र आणि स्फोटक साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.




गेल्या १६ मे रोजी ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत काही माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. चौकशीदरम्यान त्यांनी बिनागुंडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील जंगल परिसरात शस्त्रनिर्मितीचे कारखाने आणि घातक साहित्य लपवून ठेवल्याची माहिती दिली होती.या माहितीच्या आधारे एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली २१ मे रोजी विशेष अभियान पथक (सी-60), प्राणहिता दल तसेच बीडीडीएसच्या (बॉम्ब शोधक व नाशक पथक) संयुक्त तुकड्यांना शोध मोहिमेसाठी रवाना करण्यात आले.बिनागुंडाच्या उत्तरेकडील जंगल परिसरात २२ मे रोजी सुरक्षा दलांनी वेढा घालून शोधमोहीम राबवली. तपासणीदरम्यान जमिनीखाली लपवून ठेवलेले विविध प्रकारचे साहित्य हस्तगत करण्यात आले. यामध्ये लेथ मशीन, ग्राइंडिंग आणि ड्रिलिंग मशीन, जीग सॉ मशीन, प्रेशर पंप यांसारखी शस्त्रनिर्मिती यंत्रे आढळून आली. तसेच बीजीएल पाईप्स, १२ बोअर पाईप्स, इन्व्हर्टर, जनरेटर, बॅटरी, सोलर पॅनल आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले.


पोलिसांच्या माहितीनुसार, आगामी निवडणुका किंवा नक्षल सप्ताहादरम्यान सुरक्षा दलांवर घातपाती कारवाया करण्यासाठी हे साहित्य लपवून ठेवण्यात आले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकूल राज जी आणि पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या धाडसी मोहिमेत सहभागी सर्व जवानांचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी जाहीर कौतुक केले आहे.
Comments
Add Comment

Tiranga Padayatra : पनवेलमध्ये देशभक्तीचा जयघोष भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रा; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी

Prakash Abitkar : मिशन मोडवर १०० दिवसांचे आरोग्य अभियान राबवावे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानातून मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोगाचे होणार निदान मुंबई : राज्यातील

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे चौकशीचे आदेश

- हल्लेखोराला तातडीने अटक; मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस मुंबई : शिरोमणी अकाली

Chandrashekhar Bawankule : भूसंपादन प्रक्रियेत हिस्सानिहाय संयुक्त मोजणीसाठी नवी कार्यपद्धती

- महसूलमंत्र्यांचा निर्णय; नुकसानभरपाई वितरणातील अडचणी आणि सहधारकांमधील वाद कमी होणार मुंबई : सार्वजनिक

Sukhbir Singh Badal Attack : नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल (Sukhbir Singh Badal) यांच्यावर

Kalpana Kharat : भोंदू खरातची पत्नी कल्पना खरात अखेर शिर्डी पोलिस ठाण्यात हजर

Kalpana Kharat : मोठी बातमी समोर आली आहे. भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातने अखेर शिर्डी पोलिस ठाण्यात (Shirdi Police Station) हजेरी