मुंबई ते पुणे अवघ्या ९० मिनिटांत ! जेएनपीटी, अटल सेतू, पुणे थेट जोडले जाणार

१५ हजार कोटींच्या नव्या द्रुतगती मार्गाची तयारी
मुंबई-पुणे सुपरफास्ट कॉरिडॉर
वाहतूक कोंडी व अपघातांवर नवा पर्याय

मुंबई : अलीकडच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अनेक गंभीर अपघात आणि वाहतूक कोंडीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या मार्गाला समांतर असा नवीन द्रुतगर्ती मार्ग उभारण्याच्या हालचाली शासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. या नवीन मार्गाचा प्रकल्प विकास आराखडा आणि व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निविदा मागविल्या आहेत. या नवीन मार्गामुळे मुंबई ते पुणे हे अंतर केवळ ९० मिनिटांत पार करता येणार आहे.

नवीन पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग १३० किलोमीटर लांबीचा असणार आहे. हा महामार्ग रायगड जिल्ह्यातील चौक येथून सुरू होणार आहे. जेएनपीटी बंदर (पागोटे) ते चौक या महामार्गाशी हा मार्ग जोडला जाईल. हा नवीन मार्ग चौकपासून थेट पुणे बाह्यवळण मार्गावर भोरमधील शिवरे गावाशी जोडला जाणार आहे. या नव्या मार्गामुळे पुणे हे अटल सेतूशी जोडले जाणार आहे. सध्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाढती वाहतूक, अपघात आणि सततची कोंडी ही मोठी समस्या बनली आहे. नव्या मार्गामुळे सध्याच्या द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च १५ हजार कोटी रुपये असणार आहे.

नवीन मुंबई-पुणे द्रुतगती प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल आणि व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निविदा मागवल्या आहेत. हा प्रकल्प हा मार्ग आठपदरी असेल. हा मार्ग प्रवेश नियंत्रित महामार्ग म्हणून विकसित होईल. यामुळे पुणे, मुंबई, नवी मुंबई, जेएनपीटी बंदर आणि औद्योगिक कॉरिडॉर यांच्यातील मालवाहतूक अधिक वेगवान होईल. विद्यमान मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे सध्या प्रवासाचा कालावधी सुमारे अर्ध्या तासाने कमी झाला आहे. भविष्यात या मार्गावरील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता नवीन मार्ग फायद्याचा ठरेल. या मार्गावर दररोज तीन लाख वाहने धावू शकतील.

मुंबई ते बंगळुरू सहा तासांच्या आत

नवीन मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम मार्गरेषा, खर्च, भूसंपादन आणि बांधकामाचा आराखडा निश्चित केला जाणार आहे. सध्याच्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला समांतर असा हा मार्ग असेल. तो नवीन मुंबई-बंगळुरू महामार्गाचा भाग असेल. यामुळे भविष्यात मुंबई ते बंगळुरू हे अंतर सहा तासांपेक्षा कमी वेळेत पार करता येईल, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली
Comments
Add Comment

मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला नवी चालना! मेट्रो, लिंक रोड आणि ट्विन टनेल प्रकल्पांना नवी गती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश

MLA Nilesh Rane : आनंदाची बातमी, गणेशभक्तांसाठी १२ सप्टेंबरला धावणार शिवसेना एक्सप्रेस

मुंबई : कोकणात राहणाऱ्यांसाठी गणेशोत्सव आणि शिमगा अर्थात होळी हे दोन अतिशय महत्त्वाचे सण. नोकरी व्यवसायाच्या

Mumbai Anti-Narcotics Cell : मुंबईत ९ कोटी ४८ लाखांचे मेथॅम्फेटामाइन जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मुंबई आणि ग्रेटर

Kurla Landslide : कुर्ला-राजावाडी रुग्णालयातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एका तरुणाचा मृत्यू

मुंबई : कालच्या घटनेनंतर जखमी आणि मृतांची संख्या अद्ययावत करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.15 वाजता

New AC Local : २०२९-३० पर्यंत मुंबईच्या सर्व लोकल एसी होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; द्वितीय श्रेणीचे तिकीट वाढवणार नाही मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेचे

GeM : जेमच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची दुहेरी बाजी; पंचायतस्तरीय खरेदीतील उत्कृष्टतेसह सर्वाधिक खरेदी मूल्यासाठी महाराष्ट्राचा गौरव

मुंबई : शासकीय ई-बाजारपेठ अर्थात जेमच्या दशकपूर्तीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित ‘हॉनरिंग एक्सलन्स’ पुरस्कार