- हल्लेखोराला तातडीने अटक; मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस
मुंबई : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेड येथे झालेल्या हल्ल्याच्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली असून, या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला तातडीने अटक केली असून, त्याचा नेमका उद्देश काय होता, याचा तपास केला जात आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी स्वतः सुखबीर सिंह बादल यांच्याशी फोनवरून चर्चा करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. (Sukhbhir Singh Badal)
सुखबीर सिंह बादल हे आपल्या पत्नी आणि खासदार हरसिमरत कौर बादल यांच्यासह बुधवारी नांदेड येथील शिखांचे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या तख्त श्री हजूर साहिब येथे दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपून गुरुद्वारा परिसरातून बाहेर पडत असताना त्यांच्यावर अचानक हा हल्ला झाला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला असून, त्यामध्ये सुरक्षारक्षक आणि संबंधित लोक बादल यांना सुरक्षितरित्या एका इमारतीत घेऊन जाताना दिसत आहेत. या हल्ल्यात बादल यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून, तेथे कापड बांधण्यात आल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या घटनेनंतर त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार मुंबई : एकात्मिक जल ...
या घटनेवर गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, "या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच गृहविभागाने तात्काळ पावले उचलली आहेत. या हल्ल्यामागे कोणती टोळी किंवा वैयक्तिक वाद आहे का, याची सखोल माहिती घेतली जात आहे. पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर महाराष्ट्रात असा हल्ला होणे अत्यंत गंभीर असून, या प्रकरणात दोषी असलेल्या आणि पडद्यामागील सर्व संबंधित घटकांवर कठोर कारवाई केली जाईल", असेही त्यांनी स्पष्ट केले.