Sukhbir Singh Badal Attack : नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल (Sukhbir Singh Badal) यांच्यावर नांदेडमध्ये धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची घटना गुरुवारी समोर आली. या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. फडणवीस यांनी बादल यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. तसेच नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून घटनेची माहिती मागवली.


मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 11 वाजता नांदेडमधील माता साहिब गुरुद्वाराजवळ बादल यांच्यावर हल्ला झाला. एका व्यक्तीने धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत बादल यांच्या हाताला दुखापत झाली. त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने हल्ला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे हेही जखमी झाल्याची माहिती आहे.



हल्ल्यानंतर बादल यांना तातडीने नांदेडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून बादल यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.


दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात एका कथित हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, संशयित व्यक्ती निहंग सिंग असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून हल्ल्यामागील कारण आणि संबंधित व्यक्तीची भूमिका याबाबत माहिती घेतली जात आहे.


घटनेच्या पार्श्वभूमीवर गुरुद्वारा परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना तपासात कोणतीही कसूर होऊ नये, अशा सूचना दिल्याची माहिती आहे.


दरम्यान, नांदेडला जाण्यापूर्वी सुखबीर सिंह बादल यांनी कुटुंबीयांसह तख्त श्री पटना साहिब येथे भेट दिली होती. त्यानंतर ते नांदेडमध्ये आले होते. या घटनेनंतर पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास केला जात आहे.


 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली दखल


पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमधील गुरुद्वारा परिसरात झालेल्या हल्ल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी फोनवरून संवाद साधून सुखबीर सिंग बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. तसेच नांदेडच्या पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून घटनेचा सखोल तपास, सुरक्षेतील त्रुटींची चौकशी आणि दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले.
Comments
Add Comment

Prakash Abitkar : मिशन मोडवर १०० दिवसांचे आरोग्य अभियान राबवावे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानातून मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोगाचे होणार निदान मुंबई : राज्यातील

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे चौकशीचे आदेश

- हल्लेखोराला तातडीने अटक; मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस मुंबई : शिरोमणी अकाली

Chandrashekhar Bawankule : भूसंपादन प्रक्रियेत हिस्सानिहाय संयुक्त मोजणीसाठी नवी कार्यपद्धती

- महसूलमंत्र्यांचा निर्णय; नुकसानभरपाई वितरणातील अडचणी आणि सहधारकांमधील वाद कमी होणार मुंबई : सार्वजनिक

Kalpana Kharat : भोंदू खरातची पत्नी कल्पना खरात अखेर शिर्डी पोलिस ठाण्यात हजर

Kalpana Kharat : मोठी बातमी समोर आली आहे. भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातने अखेर शिर्डी पोलिस ठाण्यात (Shirdi Police Station) हजेरी

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाचे काम याच वर्षी सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड

Nilesh Rane : गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील कोकण वासियांसाठी १२ सप्टेंबरला दादर ते कुडाळ मोफत विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था

आमदार निलेश राणे यांचा सालाबाद प्रमाणे उपक्रम मालवण : गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या