Kalpana Kharat : मोठी बातमी समोर आली आहे. भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातने अखेर शिर्डी पोलिस ठाण्यात (Shirdi Police Station) हजेरी लावली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कल्पना खरात फरार होती, सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मिळाल्यानंतर कल्पना शिर्डी पोलिस ठाण्यात (Shirdi Police Station) हजर झाली.
शिर्डीतील शेतकऱ्याची जमीन व्यवहारात फसवणूक प्रकरणी अशोक खरातसह कल्पना खरातवर दाखल गुन्हा दाखल आहे. दरम्यान, या प्रकरणात शिर्डी पोलिसांनी कल्पना खरातचा जबाब नोंदवून घेतला, जमीन व्यवहाराबाबत आपल्याला कुठलीही माहिती नाही, पती अशोक खरातनेच (Ashok Kharat) परस्पर व्यवहार केल्याचा जबाब कल्पना खरातने (Kalpana Kharat) नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून कल्पना खरात फरार होती. कल्पना खरात अखेर पोलिसांसमोर आल्याने या प्रकरणात आणखी महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते.