Shirdi : साईंच्या शिर्डीचा प्रवास भक्तीपासून तोफखान्यापर्यंत...

शिर्डी : साईबाबांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डीत आंतरराष्ट्रीय ख्यातीचा खासगी तोफखाना कारखाना उभारण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीत २०० एकर भूखंडावर निबे समुहाने खासगी तोफखाना उभारला आहे. या प्रकल्पासाठी एक हजार कोटी रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक करण्यात आली आहे. तोफखाना प्रकल्पात किमान दोन हजार नागरिकांना थेट रोजगार मिळणार आहे. या व्यतिरिक्त निबे समुहाच्या प्रकल्पामुळे १०० पेक्षा जास्त एमएसएमई प्रकल्पांना चालना मिळणार आहे. यामुळे कुशल कर्मचारी - अधिकारी यांना संधी मिळेल. मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होईल. या प्रकल्पाचे संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांनी उद्घाटन केले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.



एके काळी प्रामुख्याने शस्त्र आयातदार म्हणून ओळखला जाणारा भारत, पुढील २५ ते ३० वर्षांत जगातील सर्वात मोठ्या संरक्षण निर्यातदारांपैकी एक बनण्याच्या दिशेने स्थिरपणे वाटचाल करत आहे. संरक्षण उत्पादनात खाजगी क्षेत्राचा वाटा ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे, असे याप्रसंगी संरक्षणंत्री राजनाथ सिंह म्हणाले. तर वर्षभर युद्ध झाले तरी शिर्डीच्या प्रकल्पातून या युद्धासाठी पुरेल एवढा दारूगोळा तोफांकरिता पुरविण्याची व्यवस्था होऊ शकते, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.



निबे समुहाच्या प्रकल्पात एकूण दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पातून विविध प्रकारच्या ५ लाख तोफगोळ्यांचे वर्षभरात उत्पादन घेतले जाणार आहे. अत्याधुनिक शस्त्र आणि दारूगोळा निर्मितीचे काम प्रकल्पातून चालणार आहे. शिर्डीच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्समध्ये तोफगोळे, ड्रोन, स्फोटके, एरोस्पेस उपकरणे आणि इतर विविध संरक्षण प्रणालींची निर्मिती होणार आहे.


शिर्डीतला खासगी तोफखाना कारखाना ही देशाची आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल सुरू असल्याचे उत्तम उदाहरण आहे. या प्रकल्पात विविध आकारांचे तोफगोळे, ड्रोन, क्षेपणास्त्र आदींची निर्मिती केली जाणार आहे. हा देशातील सर्वात मोठा खासगी तोफखाना कारखाना आहे. शिर्डीच्या प्रकल्पाच्या मदतीसाठी श्रीगोंद्यातील बेलवंडीत विशेष शस्त्रागार उभारले जाणार आहे. बेलवंडीत २००० कोटी रुपये खर्चून ६०० एकरांत पसरलेले महाकाय अत्याधुनिक शस्त्रागार उभारले जाणार आहे.



निबे समुहाच्या तोफखान्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या हजारो रोजगार निर्माण होणार आहेत. या प्रकल्पांमध्ये कुशल कामगारांना प्राधान्य असले तरी अनेक प्रकारच्या कामांमुळे इतरांनाही रोजगारांची संधी मिळणार आहे. देशाच्या संरक्षण सज्जतेसाठी हा एक महत्त्वाचा आणि महाकाय प्रकल्प आहे. शिर्डीच्या प्रकल्पात १५५ मिमी दारुगोळा, १२० मिमी मोर्टार आणि १२५ मिमी तोफगोळ्यांची निर्मिती प्राधान्याने आणि मोठ्या प्रमाणावर केली जाणार आहे. तर बेलवंडीतील शस्त्रागारात प्रामुख्याने टीएनटी, आरडीएक्स आणि एचएमएक्स सारख्या जड लष्करी स्फोटकांसाठा मोठा साठा ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.


शिर्डीतला प्रकल्प कार्यरत झाल्यार देशाच्या गरजा पुरविण्यासोबतच दारूगोळ्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात पण करणार आहे. या निर्यातीतून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळणार आहे. देशाचे संरक्षण उत्पादन आता १.२७ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे, तर निर्यातीने विक्रमी पातळी गाठली आहे. संरक्षण निर्यात ३८,००० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जगातील १०० पेक्षा जास्त देशांमध्ये भारताच्या संरक्षण उत्पादनांची निर्यात होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डीतल्या प्रकल्पामुळे भारताच्या संरक्षण विषयक गरजा पूर्ण होण्यास आणि परकीय गंगाजळी वाढण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

Nashik : 9 कर्मचाऱ्यांवर वेतन कपातीची कारवाई, जि.प.सीईओंची सरप्राईज व्हिजीट

Nashik : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार (Chief Executive Officer Omkar Pawar) यांनी प्राथमिक शिक्षण विभागाची अचानक

Nashik : नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी नाशिक जिल्ह्यात १० हजार पक्षी थांबे

Nashik : राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील शेतकरी गटांच्या शेतावर जैविक व नैसर्गिक पद्धतीने

Prakash Abitkar : मिशन मोडवर १०० दिवसांचे आरोग्य अभियान राबवावे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानातून मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोगाचे होणार निदान मुंबई : राज्यातील

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के

Nashik FDA Raid : नाशिकच्या 'या' भागात अन्न व औषध प्रशासनाचा मोठा छापा, बनावट सोनपापडी, मिठाई व नमकीन जप्त

Nashik FDA Raid : नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांच्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे चौकशीचे आदेश

- हल्लेखोराला तातडीने अटक; मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस मुंबई : शिरोमणी अकाली