Mumbai Airport Cocaine Seized : मुंबई विमानतळावर ११.२५ कोटींचे कोकेन जप्त; शरीरामध्ये लपवून ड्रग्जची तस्करी, चौघांना अटक

मुंबई : अंमली पदार्थ तस्करीविरुद्धच्या एका मोठ्या कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय पथकाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन वेगवेगळ्या कारवाया केल्या. या कारवायांमध्ये अंदाजे ११.२५ कोटी मूल्य असलेले २.२५ किलोग्रॅम कोकेन जप्त केले आहे. शरीरामध्ये लपवून ड्रग्जची तस्करी करणाऱ्या चार परदेशी नागरिकांना या कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आले आहे. (Mumbai Airport Cocaine Seized)



गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, २२ मे २०२६ रोजी डीआरआय अधिकाऱ्यांनी अदीस अबाबा येथून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एक महिला आणि एक पुरुष प्रवाशाला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर, दोन्ही प्रवाशांनी तस्करीसाठी अंमली पदार्थ असलेल्या कॅप्सूल गिळल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्याकडून एकूण ८४ कॅप्सूल हस्तगत करण्यात आल्या. अवैध बाजारात जवळपास ७ कोटी रुपये किंमत असलेले १.४० किलोग्रॅम कोकेन आढळून आले. (Mumbai Airport Cocaine Seized)



या आधीच्या कारवाईत, १९ मे २०२६ रोजी डीआरआय अधिकाऱ्यांनी अदीस अबाबा येथून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका आफ्रिकन पुरुष आणि एका आफ्रिकन महिला प्रवाशाला ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान, दोन्ही प्रवाशांनी अंमली पदार्थ असलेल्या कॅप्सूल गिळल्याची कबुली दिली. त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्या शरीरातून एकूण ६३ कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या. अवैध बाजारात सुमारे ४.२५ कोटी रुपये किंमत असलेले ८५० ग्राम कोकेन जप्त करण्यात आले.(Mumbai Airport Cocaine Seized)



हा सर्व अंमली पदार्थांचा साठा अंमली पदार्थ आणि अंमली द्रव्ये कायदा, १९८५ अंतर्गत जप्त करण्यात आला असून, या दोन्ही कारवायांधील एकूण ४ प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. नशामुक्त भारत घडवण्याच्या आपल्या संकल्पावर डीआरआय ठाम असून, अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी, आंतरराष्ट्रीय तस्करांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी आणि देशाचे आरोग्य, कल्याण व सुरक्षा सुरक्षित ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. (Mumbai Airport Cocaine Seized)

Comments
Add Comment

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला नवी चालना! मेट्रो, लिंक रोड आणि ट्विन टनेल प्रकल्पांना नवी गती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश

MLA Nilesh Rane : आनंदाची बातमी, गणेशभक्तांसाठी १२ सप्टेंबरला धावणार शिवसेना एक्सप्रेस

मुंबई : कोकणात राहणाऱ्यांसाठी गणेशोत्सव आणि शिमगा अर्थात होळी हे दोन अतिशय महत्त्वाचे सण. नोकरी व्यवसायाच्या

Mumbai Anti-Narcotics Cell : मुंबईत ९ कोटी ४८ लाखांचे मेथॅम्फेटामाइन जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मुंबई आणि ग्रेटर

Kurla Landslide : कुर्ला-राजावाडी रुग्णालयातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एका तरुणाचा मृत्यू

मुंबई : कालच्या घटनेनंतर जखमी आणि मृतांची संख्या अद्ययावत करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.15 वाजता

New AC Local : २०२९-३० पर्यंत मुंबईच्या सर्व लोकल एसी होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; द्वितीय श्रेणीचे तिकीट वाढवणार नाही मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेचे