China coal mine : कोळसा खाणीत मोठी दुर्घटना, 90 कामगारांचा मृत्यू , अनेकजण बेपत्ता

Major accident in China's coal mine : चीनच्या शांक्सी प्रांतात एका मोठी दुर्घटना घडली आहे. शांक्सी प्रांतात असलेल्या कोळसा खाणीत ही भीषण दुर्घटना घडली असून या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 90 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 9 जण अद्यापही बेपत्ता आहेत. मागच्या एक दशकातील ही चीनमधील सर्वात मोठी कोळसा खाण दुर्घटना असल्याचे सांगितले जात आहे.


शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शांक्सी प्रांताच्या किनयुआन काउंटीमध्ये शुक्रवारी एका कोळसा खाणीत ही दुर्घटना घडली. राजधानी बीजिंगपासून हा भाग महत्त्वाचे म्हणजे 520 किलोमीटर अंतरावर आहे. ही दुर्घटना घडण्याआधी कार्बन मोनोऑक्साइड गॅसचा अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानंतर काही वेळाने हा स्फोटो झाला. त्यावेळी खाणीत 247 कामगार काम करत होते. स्फोटानंतर अनेक मजुरांना बाहेर काढण्यात आलं. पण अनेक लोक आत अडकले होते.



दुर्घटनेत आतापर्यंत 90 जणांचा मृत्यू


या घटनेत आतापर्यंत 90 जणांचा मृत्यू झाला आहे. मदत आणि बचाव पथक बेपत्ता मजुरांचा शोध घेत आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी बचाव पथकांना बेपत्ता मजुरांना शोधून काढण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावे असा आदेश दिला आहे. या दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे.



शांक्सी हा चीनमधला सर्वात मोठा कोळसा उत्पादन करणारा प्रांत


शांक्सी हा चीनमधला सर्वात मोठा कोळसा उत्पादन करणारा प्रांत आहे. चीनने मागच्या काही वर्षात कोळसा खाणीची सुरक्षा चांगल्या दर्जाची केल्याचा दावा केला आहे. मात्र, तरीही दुर्घटना थांबलेल्या नाहीत. फेब्रुवारी 2023 साली मंगोलियाच्या कोळसा खाणीत भूस्खलन झालं होतं. यात 53 मजुरांचा मृत्यू झालेला. मागच्या महिन्यात शांक्सीमध्येच लुलियांग भाग कोळसा खाण दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला होता. तर आता पुन्हा एकदा कोळसा खाण दुर्घटना समोर आली आहे.



कोळसा खाण चालवणारे अधिकारी ताब्यात


दरम्यान, चीनच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कोळसा खाण चालवणाऱ्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. गॅस स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, खाणीमध्ये कार्बन मोनोऑक्साइड या अत्यंत विषारी, गंधहीन वायूचं याचे प्रमाण 'मर्यादेपेक्षा जास्त' आढळले आहे. चीनच्या आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयानं या मोहिमेत मदत करण्यासाठी सहा बचाव पथकांमध्ये 345 जवान पाठवले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

Comments
Add Comment

Iran Attack : इराणकडून जॉर्डन-कुवेतमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ल्याचा दावा

तेहरान : इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) आणि इराणी सैन्याने गुरुवारी कुवेत आणि जॉर्डनमधील

Iran-US War :ट्रम्प प्रशासनासमोर आर्थिक आव्हान; इराणसह युद्धासाठी नव्या निधीची गरज

Iran-US War : इराण-अमेरिका युद्ध (Iran-US War) पुन्हा तीव्र होत असताना अमेरिकेच्या संरक्षण खर्चात (Defense Spending) मोठी वाढ झाली आहे.

Amazon Data Center : Amazon च्या डेटा सेंटरवर इराणच्या हल्ल्याचा दावा; AWS सेवांवर परिणामाची चर्चा, मात्र अधिकृत पुष्टी नाही

तेहरान : इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने बहरीनमधील Amazon Web Services (AWS) च्या महत्त्वाच्या डेटा

Afghanistan Floods : अफगाणिस्तानात भीषण पुराचा तडाखा: २० जणांचा मृत्यू, १०० हून अधिक बेपत्ता; बचावकार्य सुरू

काबुल: अफगाणिस्तानमध्ये सोमवारी अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान २० जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक

Russia-Ukraine War : युक्रेनमध्ये मुंबईच्या कंपनीच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ४ भारतीय खलाशांचा दुर्दैवी मृत्यू

नवी दिल्ली : युक्रेन-रशिया युद्धाच्या (Ukraine-Russia War) पार्श्वभूमीवर भारताला मोठा धक्का बसला आहे. युक्रेनमधील ओडेसा बंदर

India Iran : तेहरानचा प्रवास पुढे ढकला, इराण तातडीने सोडा', भारतीय दूतावासाची नागरिकांसाठी सूचना

तेहरान: अमेरिकेसोबतचा युद्धविराम संपल्याची घोषणा झाल्यानंतर अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा तीव्र झाला