Online ​​Fraud : फेसबुकवरील एका क्लिकने केला घात! ‘ट्रेडिंग’च्या आमिषाला बळी; सोलापूरातील एजंटची तब्बल ६८ लाखांची फसवणूक

सोलापूर : सोलापूर शहरात ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली मोठी सायबर फसवणूक उघडकीस आली आहे. फेसबुकवरील आकर्षक जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर एका टेक्स्टाईल एजंटला तब्बल ६८ लाख २६ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. या धक्कादायक प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून सोशल मीडियावरील गुंतवणूक जाहिरातींचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. (Online ​​Fraud)


या प्रकरणी किरण नागनाथ कोटा (वय ४९, रा. रंगराज नगर, मार्केट यार्डामागे, सोलापूर) यांनी शहर सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (Online ​​Fraud)



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास किरण कोटा हे घरी असताना फेसबुक स्क्रोल करत होते. त्यावेळी त्यांना ‘IIFL Capital Limited’च्या नावाने ऑनलाइन ट्रेडिंगसंबंधी आकर्षक जाहिरात दिसली. “कमी गुंतवणुकीत मोठा नफा” असे आश्वासन देणाऱ्या या जाहिरातीवर त्यांनी क्लिक केले. त्यानंतर त्यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील करण्यात आले. (Online ​​Fraud)


या ग्रुपमध्ये आर. व्यंकटरमन, टीना मल्होत्रा आणि टीना नावाचे सदस्य ॲडमिन म्हणून सक्रिय होते. त्यांनी कोटा यांच्याशी थेट संपर्क साधत ‘डीएमए’ म्हणजेच डायरेक्ट मार्केट ॲक्सेस अकाउंटद्वारे शेअर बाजारात ट्रेडिंग करून मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला काही व्यवहारांमध्ये नफा दाखवून त्यांचा विश्वास जिंकण्यात आला. (Online ​​Fraud)



फिर्यादीला शेअर मार्केटची प्राथमिक माहिती असल्याने त्यांनी संबंधितांच्या सांगण्यानुसार विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम जमा केली. ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर वाढता नफा आणि वाढलेली रक्कम दाखवण्यात येत असल्याने त्यांना संशय आला नाही. मात्र, नंतर पैसे काढण्याचा प्रयत्न करताच विविध कारणे सांगून टाळाटाळ सुरू झाली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. (Online ​​Fraud)


सायबर गुन्हेगारांनी बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म, खोटे स्क्रीनशॉट आणि बनावट नफ्याचे आकडे दाखवून कोटा यांना जाळ्यात ओढल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात वापरण्यात आलेले मोबाईल क्रमांक, बँक खाती आणि डिजिटल व्यवहारांचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. (Online ​​Fraud)



या प्रकरणाचा तपास शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, संबंधित आरोपी परराज्यातील किंवा आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटशी संबंधित असण्याची शक्यता तपासली जात आहे. (Online ​​Fraud)


दरम्यान, सायबर पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर दिसणाऱ्या गुंतवणूक, ट्रेडिंग किंवा जलद नफा मिळवून देणाऱ्या जाहिरातींवर सहज विश्वास ठेवू नये. कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनीची अधिकृत माहिती तपासावी, तसेच अनोळखी व्हॉट्सॲप ग्रुप किंवा लिंकपासून सावध राहावे, असे पोलिसांनी सांगितले आहे. (Online ​​Fraud)

Comments
Add Comment

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ला निंदनीय; हल्लेखोरांना सोडणार नाही – एकनाथ शिंदे

मुंबई : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये

Sangli ST Accident : महाराष्ट्रात पुन्हा एकदा भीषण अपघात, सांगलीत एसटीच्या दोन बसची समोरासमोर धडक; 2 ते 3 प्रवाशांचा मृत्यू

सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात रेणावी घाटात गुरुवारी एसटीच्या दोन बसची समोरासमोर भीषण धडक झाली.

Drone City Maharashtra : ड्रोन उद्योगासाठी मंत्रीस्तरीय टास्क फोर्स

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ड्रोन सिटी’ मुंबई : राज्यातील ड्रोन

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील ३ तासांत मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज

मुंबई : राज्यातील अनेक भागांत सध्या पावसाचे वातावरण असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी काही

Tiranga Padayatra : पनवेलमध्ये देशभक्तीचा जयघोष भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रा; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी