Nashik : डिझेलची टंचाई निर्माण झाल्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी सोमवारपासून (दि.२५) कांदा व धान्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, जोपर्यंत डिझेलचा पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत अन्य राज्यांमध्ये कांदा व धान्य पाठविणेही बंद ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतमालावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांनीही हेच धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा थेट परिणाम इतर भागांत जाणाऱ्या भाजीपाल्यावरही होण्याची शक्यता आहे.
मुंबई : राज्यासह संपूर्ण देशात सध्या प्रचंड उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा अनेक ठिकाणी ४० अंशांच्या पुढे गेला ...
केंद्र सरकारने मागील आठवड्यात दोन वेळा पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढवल्यानंतर अचानक डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासन आणि राज्य सरकारकडून डिझेल व पेट्रोल मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात शेतीसाठी आवश्यक डिझेल उपलब्ध होत नसल्याने शेतीकामांवर थेट परिणाम होऊ लागला आहे.
दुसरीकडे, भाजीपाला, कांदा व धान्य बाजार समितीत लिलावासाठी आणण्यासाठी शेतकऱ्यांकडे डिझेल नसल्याने आवकही प्रभावित होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी पुढील पावले उचलण्यास सुरुवात केली असून, सोमवारपासून मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. कांदा व इतर शेतीमाल इतरत्र पाठविण्यासाठी ट्रकचालकांना इंधन उपलब्ध होत नसल्यामुळे बाजार समितीतील कांदा व धान्याचे लिलाव सोमवार (दि. २५) पासून बेमुदत बंद राहणार आहेत. लिलाव ठप्प झाल्यास कांद्याचे दर आणखी घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्यापारी असोसिएशनने सोमवारपासून कांदा व धान्य लिलावात सहभागी होणार नसल्याचे पत्र बाजार समितीला दिले आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम; बोगस मतदान रोखणे हाच मोहिमेचा हेतू मुंबई : मतदार याद्यांच्या पुनरीक्षणासाठी राबवल्या जाणाऱ्या 'एसआयआर' ...
या इंधन टंचाईमुळे केवळ व्यापारीच नाही, तर शेतकरी, ट्रान्सपोर्टर्स आणि अडते यांच्यातही चिंतेचे वातावरण आहे. लासलगाव बाजारपेठ बंद राहिल्यास त्याचा थेट परिणाम देशातील कांदा पुरवठ्यावर होईल आणि बहुतांश राज्यांमध्ये कांद्याचे भाव कडाडू शकतात. त्यामुळे आता सरकार यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




