'Vande Mataram' Mandatory in Madrasas : बंगाल सरकारचा मोठा निर्णय; आता बंगालमधील मदरशांमध्ये ‘वंदे मातरम’ गायन अनिवार्य

कोलकाता : पश्चिम बंगालमधील शुभेंदू सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. बंगाल सरकारच्या अल्पसंख्याक कार्य आणि मदरसा शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, राज्यातील सर्व मदरसांमध्ये आता ‘वंदे मातरम्’ गायन अनिवार्य करण्यात आले आहे. सरकारी, अनुदानित तसेच विनाअनुदानित सर्व मदरसांना हा आदेश लागू असेल आणि त्याचे पालन करणे बंधनकारक असेल. ('Vande Mataram' Mandatory in Madrasas)


यापूर्वी गेल्या आठवड्यात शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना एक नोटीस जारी करून दररोज वर्ग सुरू होण्यापूर्वी ‘वंदे मातरम्’ गायन सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले होते. आदेशात म्हटले होते की, सकाळच्या प्रार्थना सभेमध्ये ‘वंदे मातरम्’चे गायन अनिवार्य करण्यात यावे, जेणेकरून राज्यातील सर्व विद्यार्थी तत्काळ प्रभावाने हे गीत गातील. राज्य सरकारचा हा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने जानेवारी महिन्यात जारी केलेल्या त्या निर्देशानंतर आला आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षपूर्तीच्या निमित्ताने त्याचे गायन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. ('Vande Mataram' Mandatory in Madrasas)



यापूर्वीच्या व्यवस्थेनुसार शाळांच्या सकाळच्या प्रार्थना सभेत (बांग्लार माटी बांग्लार जल) हे गीत गायन अनिवार्य होते. मात्र, नव्या आदेशात हे स्पष्ट करण्यात आलेले नाही की राज्यगीत आता ‘वंदे मातरम्’ आणि राष्ट्रगीतासोबत कायम ठेवले जाणार की नाही.काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी या निर्णयाबाबत व्यावहारिक अडचणींचा मुद्दा उपस्थित केला आहे. एका शाळा प्रमुखांनी सांगितले की, “आम्ही राष्ट्रगीत काढून टाकू शकत नाही, कारण ते अनिवार्य आहे. आता प्रथम ‘वंदे मातरम्’ गायले जाईल आणि त्यात राज्यगीतही जोडले गेले, तर अधिक वेळ लागेल. त्यामुळे वर्ग सुरू होण्यास उशीर होऊ शकतो. नोटीसमध्ये राज्यगीताबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही. विद्यार्थ्यांना सलग तीन गीते म्हणण्यासाठी थांबवणे सोपे नाही.” ('Vande Mataram' Mandatory in Madrasas)



शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, नव्या निर्देशात केवळ ‘वंदे मातरम्’बाबत आदेश देण्यात आले आहेत. अधिकाऱ्याने म्हटले, “आम्हाला शालेय प्रार्थनेचा भाग म्हणून ‘वंदे मातरम्’ सुरू करण्यास सांगितले आहे. मात्र, राज्यगीताचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही.”दरम्यान, अनेक शाळांनी या आदेशाची अंमलबजावणी सुरूही केली आहे. ('Vande Mataram' Mandatory in Madrasas)

Comments
Add Comment

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने ऐतिहासिक विधेयकाचे कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी

Supreme Court Order : हरवलेल्या व्यक्तीच्या प्रत्येक प्रकरणात त्वरित एफआयआर नोंदवा, सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कठोर आदेश

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले आहेत की, जेव्हा एखादी

Air India Phuket Delhi : बाप रे...! नशा करून पायलेटची हवेत स्वारी; एअर इंडियाच्या विमानातील कॅप्टनची दुसरी डोप टेस्टही पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या (Air India) फुकेट-दिल्ली विमानाशी संबंधित तपासात नवी माहिती समोर आली आहे. 4 ऑगस्ट रोजी AI-2379 या

Independence Day 2026 : 15 ऑगस्टच्या तयारीला वेग; पंतप्रधान मोदींचे ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

मुंबई : भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर आला असून देशभरात त्याची तयारी सुरू झाली आहे. याच

Sheikh Hasina : बांगलादेशमधील हालचालींना वेग? RAW प्रमुखांनी घेतली पंतप्रधान तारिक यांच्या संरक्षण सल्लागारांशी भेट; शेख हसीनांच्या परतीचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली : बांग्लादेशातील राजकीय घडामोडींना आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. भारताची गुप्तचर संस्था रिसर्च

YouTube च्या नियमात मोठे बदल! आता नवीन क्रिएटर्ससाठी कमाईचा मार्ग होणार आणखी कठीण

नवी दिल्ली : युट्यूब (YouTube) वरून कमाई करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवीन क्रिएटर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे.