India exposed Pakistan : भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानची लायकी काढली

संयुक्त राष्ट्रे : ज्या देशाचा स्वतःचा इतिहास नरसंहाराने कलंकित आहे, अशा पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत मुद्द्यांवर आणि मानवाधिकारांवर आम्हाला ज्ञान शिकवावे, हा खूप मोठा विरोधाभास आहे," अशा कडक शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानची बोलती बंद केली आहे. स्वतःचे अंतर्गत अपयश लपवण्यासाठी देशाच्या आत आणि सीमेबाहेर हिंसाचार पसरवणे हा पाकिस्तानचा जुनाच पॅटर्न असल्याचा घणाघातही भारताने केला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 'सशस्त्र संघर्षात नागरिकांचे संरक्षण' या विषयावरील वार्षिक खुल्या चर्चेदरम्यान भारताने ही आक्रमक भूमिका मांडली.



संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी हरीश पर्वथनेनी यांनी पाकिस्तानच्या प्रतिनिधीने जम्मू-काश्मीरचा जुनाच राग आळवल्यानंतर पाकला सडेतोड उत्तर दिले. पर्वथनेनी म्हणाले, "नरसंहाराचा दीर्घ आणि डागाळलेला इतिहास असलेल्या देशाने भारताच्या पूर्णपणे अंतर्गत असलेल्या विषयांवर भाष्य करावे, ही अत्यंत हास्यास्पद बाब आहे. स्वतःच्याच जनतेवर बॉम्बफेक करणाऱ्या आणि पद्धतशीरपणे नरसंहार घडवून आणणाऱ्या देशाकडून अशाच कृत्यांची अपेक्षा केली जाऊ शकते."



अफगाणिस्तानमधील हवाई हल्ल्यांचा दिला दाखला : या वर्षी मार्च महिन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांचा संदर्भ देत भारताने पाकिस्तानचा क्रूर चेहरा जगासमोर आणला. पर्वथनेनी यांनी ठणकावून सांगितले की, "पवित्र रमझान महिन्यात, जेव्हा जगात शांतता आणि करुणेचे वातावरण असते, तेव्हा पाकिस्तानने काबूलमधील 'ओमिद व्यसनमुक्ती रुग्णालया'वर हवाई हल्ला केला होता, हे जग विसरलेले नाही." संयुक्त राष्ट्राच्या अफगाणिस्तानमधील साहाय्य मिशनचा दाखला देत भारताने सांगितले की, पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यात २६९ निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला होता, तर १२२ जण जखमी झाले होते.



९४,००० नागरिक विस्थापित: कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय सुविधेला लष्करी लक्ष्य बनवणे समर्थनीय ठरू शकत नाही. रात्रीच्या अंधारात निष्पाप नागरिकांना लक्ष्य करायचे आणि दुसरीकडे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या गप्पा मारायच्या, हा पाकिस्तानचा निव्वळ दुटप्पीपणा आहे. या सीमापार सशस्त्र हिंसाचारामुळे ९४,००० हून अधिक अफगाण नागरिक विस्थापित झाले आहेत.


'ऑपरेशन सर्चलाइट'ची करून दिली आठवण : भारताने पाकिस्तानला त्यांच्याच इतिहासातील काळ्या पानावरील अत्याचारांची आठवण करून दिली. १९७१ मधील 'ऑपरेशन सर्चलाइट'चा उल्लेख करत पर्वथनेनी म्हणाले की, पाकिस्तानने आपल्याच लष्कराद्वारे तब्बल ४ लाख महिलांवर पद्धतशीरपणे केलेल्या सामूहिक बलात्काराच्या मोहिमेला अधिकृत मंजुरी दिली होती. अशा क्रूर इतिहास असलेल्या देशाने मानवाधिकारांवर बोलणे म्हणजे ढोंगीपणाचा कळस आहे.

Comments
Add Comment

Iran Cyber Attack : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांना इराणचे हॅकिंगने उत्तर ? अमेरिकेच्या नागरिकांना हाल हाल करून मारण्याचा इराणचा डाव ?

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण

Colombia Earthquake : कोलंबियाला भूकंपाचा भीषण धक्का! ७.४ रिश्टरचा शक्तिशाली भूकंप; १३२ जणांचा मृत्यू, परिस्थिती गंभीर

बोगोटा : कोलंबियाच्या पश्चिम भागाला सोमवारी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या

Russian cosmonaut : रशियन अंतराळवीरांकडून भारताला स्वातंत्र्यदिनाच्या विशेष शुभेच्छा

नवी दिल्ली : भारत आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील रशियन

Japan warn US : अमेरिकन प्रचारात ॲनिमे व गेम्सचा वापर, जपानने अमेरिकेला सुनावले

टोकियो : जागतिक मुत्सद्देगिरीत एक अत्यंत अनोखा वाद समोर आला आहे. जगभरात लोकप्रिय असलेल्या जपानी संस्कृतीची ओळख

Iran-US tensions : जमिनीवरील हल्ल्यास प्रत्युत्तर देण्याचा इराणचा इशारा, ट्रम्प यांच्या माघारीच्या प्रयत्नांना खीळ  

इराण आणि अमेरिका यांच्यातील भू-राजकीय तणाव दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. अमेरिकेचे लष्कर इराणी भूमीवर

Mumbai Terror Attack : २६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल अजीजचा संशयास्पद मृत्यू; मशिदीच्या गेटवर अचानक कोसळला, विषप्रयोगाची शक्यता?

- इस्लामाबादमध्ये अनोळखी ठिकाणी जेवण केल्यानंतर काही वेळातच मृत्यू इस्लामाबाद : पाकिस्तानची राजधानी